परफेक्शन करणारा पत्रकार असावा :- ओमप्रकाश शेटे*
*परफेक्शन करणारा पत्रकार असावा :- ओमप्रकाश शेटे*
शिर्डी ( प्रतिनिधी )
पट्टीतून आणि खिळ्यातून आम्ही घडलो अशी जाणीव पत्रकाराला झाली पाहिजे. सकारात्मक पत्रकारिता काय असते हे जगाला दाखवून दिले पाहिजे. जगात पत्रकारितेवर प्रश्न चिन्ह निर्माण केले जातात हे खेदजनक आहे. त्यासाठी परफेक्शन करणारा पत्रकार असावा असे मत आयुष्यमान भारत कोर कमिटीचे सदस्य ओमप्रकाश शेटे यांनी केले. व्हॉइस ऑफ मीडिया आयोजित राज्यस्तरीय अधिवेशन प्रसंगी शिर्डी येथे ते बोलत होते.पत्रकारांच्या आनंदांवर आणि सुखावर टीका टिपणी होऊ शकत नाही. पत्रकाराने मनोरंजन करू नये का ? पत्रकारितेत झालेले स्थित्यंतरे पत्रकार कळाले नसून ते आत्मसात करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले पुढे म्हणाले की, पत्रकारांना मान आहे पत्रकारांना भावना आहेत. वार्धक्याने याने अनेक पत्रकारांचा बळी गेला. पत्रकारिता हा व्यवसायिक दृष्टिकोन होऊ शकत नाही. पत्रकारिता ही फॅशन म्हणून करावी. व्यवसाय म्हणून नव्हे असे नाही केले तर जीवनात तडजोड करावी लागेल. तर पत्रकार बळी पडेल याचे भान पत्रकाराना ठेवावे लागेल. पत्रकार आणि शेतकऱ्याची अवस्था एकच आहे असे ते म्हणाले. विविध मान्यवरांच्या अनुभवाच्या शिदोरीने आज आपली भूक शमली असल्याचे ते म्हणाले एखाद्या योजनेचा पाया आणि कळस कसा असावा अशी पत्रकारांची भूमिका असावी. पत्रकाराला जाणीव झाली पाहिजे.
चौकट
पाय जमिनीवर तर नजर आकाशाकडे पाहिजे. पाचशे पत्रकार एकत्र येणे म्हणजे अख्खा देश एकत्र येणे याचे सर्व श्रेय संदीप काळे यांना जाते कमी वयाचा माणूस आणि जास्त पुस्तक लिहिणारा माणूस म्हणजे संदीप काळे होय. रक्ताची नाती आणि रक्ताच्या पलीकडची नाती कशी जपावी याचे कसब संदीप काळे यांच्याकडून शिकले पाहिजे. पत्रकारांसाठी आर्थिक महामंडळ करण्यासाठी संदीप काळे यांनी अट्टहास केला असल्याचे श्री शेटे यांनी विशेषत्वाने नमूद केले.