*पत्रकारांनी सत्व, तत्त्व आणि विचार मूल्ये जपली तरच पत्रकारिता टिकेल :- प्रकाश पोहरे*
*पत्रकारांनी सत्व, तत्त्व आणि विचार मूल्ये जपली तरच पत्रकारिता टिकेल :- प्रकाश पोहरे*
शिर्डी [ प्रतिनिधी ]
पत्रकारांनी भल्या भल्याची कान उघडणी केली पाहिजे. पोलीस प्रशासन, आयुक्त, मंत्री, संत्री असो वा मग समाजातील कोणी असो जे चुकतात, समाजाचा गैरवापर करतात अशा भल्याभल्यांची कान उघडणी करण्याचे काम पत्रकारांनी केले पाहिजे. दर्पण काळात उत्पन्नाचा तीस टक्के भाग
वृत्तपत्र तयार करण्यासाठी केला जात असे. आज आपण रद्दी छापत असल्यामुळे पत्रकारांनी पत्रकारांची किंमत करून घेतल्याची खंत संपादक प्रकाश पोहरे यांनी व्यक्त केली. पत्रकारांनी सहकार्य नेमके कोणाला करावे याचे आत्मपरीक्षणही करावे असे आवाहनच त्यांनी या अधिवेशनात पत्रकारांना केले. एवढेच नव्हे तर आपल्या विचारांना मूल्य असली पाहिजे. पत्रकारांनी सत्व आणि तत्व जपावे तरच पत्रकारिता टिकेल आणि पत्रकारही टिकतील असे ते म्हणाले.
शिर्डी येथे दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन प्रसंगी वरिष्ठ संपादक प्रकाश पोहरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना प्रतिपादन केले. प्रकाश पोहरे पुढे म्हणाले की, पेपर काढणारे मालक नसून, पेपर विकत घेणारच मालक असल्याचे ते म्हणाले. इम्पोर्टेड पेपर पेक्षा बातमीचा विषय वाचकांना द्या, मग तो पेपर कसाही असो वाचक तो वाचणारच. पत्रकारांनी वाचकाची भूक ओळखून भूक शमवावी असेही ते म्हणाले. वाचकांना विकत घेऊ नका, तर वाचकांना पेपर विकत घ्यायला भाग पाडा. पत्रकार आपापल्या परीने लिहितो. परंतु, भांडवलशाही ने मालकांवर कब्जा केला. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मालकांनी गेले तरच मीडियाचा वचक राहील, लोकशाहीच्या महत्त्व पूर्ण स्तंभावर राहील असे ते म्हणाले. पाण्यावर कोणीही नाव चालू शकतो. परंतु रेतीमध्ये नाव चालवता आली पाहिजे, याच पठडीतला मी पत्रकार असून मी पत्रकारितेतूनच आपण घडलो असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
राजकारण आणि समाजकारणात आता भिंत आणली गेली आहे . मानवी मूल्यांचे राजकारण निंदनीय असून अशावेळी आरसा आणि बॅटरी दाखवा. पत्रकारांनी कोणाच्याही विचारांची बांधिलकी जपू नये. उलटदर्शी समाज घातक अशा विचारांना वाचा फोडावी असे पोहरे म्हणाले.