बाल संस्कार शिबिराच्या माध्यमातून महाराष्ट्र दिन साजरा आशापुर येथे अनोखा उपक्रम
बाल संस्कार शिबिराच्या माध्यमातून महाराष्ट्र दिन साजरा
आशापुर येथे अनोखा उपक्रम
ठानगाव प्रतिनिधी
कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाचे औचीत्य साधून दिनांक १ मे पासून सिन्नर तालुक्यातील आशापुर टेंभुरवाडी या गावांमध्ये महाराष्ट्र सुसंस्कृत घडवण्यासाठी मोठ्या उत्साहात बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले. मोठ्या आनंदाने विश्वाचं आराध्य असणारे श्री पांडुरंग परमात्म्याच्या पूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी गावातील संपूर्ण वारकरी व प्रतिष्ठित व्यक्तिमत्व कार्यक्रमासाठी उपस्थित होते. तसेच महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार व कलाकारांनी याप्रसंगी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
युवा कीर्तनकार हभप गणेश महाराज जंजिरे
ह भ प ओम महाराज वेदपाठक
ह भ प रोशन महाराज कडभाने
ह भ प अविनाश महाराज शिंदे
ह भ प नवनाथ महाराज ब-हे
ह भ प अतुल महाराज सहाणे
ह भ प अमरनाथ महाराज शिंदे
ह भ प विशाल महाराज पाटोळे
व हनुमान भजनी मंडळ आशापुर यांच्या उपस्थितीत श्रीरामांच्या प्रतिमेची व विण्याची सामाजिक कार्यकर्ते मुकुंद काकड मुंबई यांच्या हस्ते करण्यात आले..
यावेळी जनसेवा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रामदास भोर ,बबन काकड ,अविनाश महाराज, रोशन महाराज कडभाने ,प्रतीक शिंदे ,संजय शेठ शिंदे ,राजाराम काकड भाऊसाहेब काकड तसेच गावातील लहान मोठी मुलं व माता-भगिनींनी या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रतिसाद देऊन उपस्थिती लावली. आशापुर येथील समाज कार्यालयामध्ये मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी भाविक उपस्थित होते.