सत्कर्मामुळे मनुष्याच्या पिढीचा उध्दार होतो : गणेश महाराज करंजकर
सत्कर्मामुळे मनुष्याच्या पिढीचा उध्दार होतो : गणेश महाराज करंजकर
ठाणगाव, ता. १९ :
आपल्या हिंदू संस्कृतीत अध्यात्माला विशेष महत्व आहे. या अनुशंगाने ठानगाव येथील स्वामी कथा ही जण सेवेचाच एक भाग होऊन गेला आहे. या कथेस लाभलेला उदंड प्रतिसाद न भूतो न भविष्यती असाच म्हणावा लागेल .
मनुष्याने आपल्या संसारीक आयुष्यात केलेल्या सत्कर्मामुळे पुढील पिढीला योग्य संस्कार मिळून संपूर्ण पिढीचा उध्दार होतो त्यामुळे आजच्या विज्ञान, तंत्रज्ञानाच्या युगात मानवाला आध्यात्मिक शक्तीची गरज आहे असे मत गणेश महाराज करंजकर यांनी व्यक्त केले. ठाणगाव (ता. सिन्नर ) येथे श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक व बालसंस्कार केंद्रातर्फे आयोजित श्री स्वामी समर्थ संगितमय चरित्रकथा कार्यक्रमात ते बोलत होते. स्वामी कथेच्या दुसर्या दिवशी महाराष्ट्रातील पहिल्या महिला संबळवादक मोहिनी भुसे यांच्या संबळ वादनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कलीयुगात संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी अध्यात्माशिवाय पर्याय नाही. सत्कर्म आणि दुष्कर्म याचे संस्कार नव्या पिढीवर होणे ही काळाची गरज आहे. केलेल्या दुष्कर्माचे दूरगामी परिणाम संपूर्ण पिढीला भोगावे लागतात याविषयी गणेश महाराज करंजकर यांनी विश्लेषण केले. संगिताच्या तालावर रममाण होत भाविकांनी मनसोक्तपणे नृत्याचा आनंद घेतला. सिन्नर तालुक्यासह इतर जिल्ह्य़ातील सेवेकरी मोठ्या संख्येने या कथा कार्यक्रमात सहभागी झाले होते. श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती आणि श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकटल्याचा जिवंत देखावा भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला. २००६च्या दहावी विद्यार्थी बॅचतर्फे भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. स्वामींच्या आरतीने व फटाक्यांच्या आतषबाजीने कार्यक्रमाची सांगता झाली. केंद्र संयोजक जयराम शिंदे यांनी सुत्रसंचालन केले.
चौकट
महाराष्ट्रातील पहिली महिला संबळवादक मोहिनी भुसे यांच्या संबळ आमच्या तालाने अनेक भाविकांना मंत्रमुग्ध होत थिरककण्यास भाग पाडले.
फोटो ओळी
ठाणगाव, ता सिन्नर येथे संगितमय श्री स्वामी समर्थ चरित्रकथा कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना गणेश महाराज करंजकर
दुसर्या छायाचित्रात उपस्थित भाविक जनसमुदाय
…….