ताज्या घडामोडीसामाजिक

गुरुंच्या वचनावर विश्वास ठेवल्यास आयुष्य आनंदी होते : गणेश महाराज करंजकर


गुरुंच्या वचनावर विश्वास ठेवल्यास आयुष्य आनंदी होते : गणेश महाराज करंजकर

 

ठाणगाव  :

चिंता, क्लेश आणि दु:ख नाही असा माणूस जगात नाही परंतू आपण आपले सर्व दु:खी वेदना गुरुंवर सोडल्यास माणसाचे जीवन आनंदी झाल्याशिवाय राहणार नाही असे मत गणेश महाराज करंजकर यांनी व्यक्त केले. ठाणगाव (ता. सिन्नर ) येथे श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक व बालसंस्कार केंद्रातर्फे आयोजित श्री स्वामी समर्थ संगितमय चरित्रकथा कार्यक्रमात ते बोलत होते. स्वामी कथेच्या त्रिदल महिला भजनी मंडळांतर्फे स्वामी भजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कलीयुगात माणूस स्वधर्म विसरुन नास्तिक बनत चालला आहे, आणि त्याचाच विपरित परिणाम आजची पिढी भोगत आहे. आज प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अनंत अडचणी आहेत. गृहकलह, व्यसनाधीनता, आजारपण, पैशाच्या अडचणी अ़शी विविध कारणे मनुष्याच्या दु:खाची कारणे आहेत परंतू आज दुसऱ्याबद्दल द्वेष, तिरस्कार, संकुचित प्रवृत्ती मनुष्याने आत्मसात केलेली आहे आपल्या याच प्रवृत्तीमुळे आपल्या आयुष्यात दु:खी आहे हे कुणीही माणत नाही ही सर्वात मोठी समस्या आहे. ज्या घरातपिढीजात अध्यात्म आहे तेच घर किंवा पिढी आज संस्कारी आहे. आणि पूर्व पुण्याई शिवाय माणूस कथा, किर्तनाला येवू शकत नाही. जगात सर्वश्रेष्ठ असलेला आपला हिंदू धर्म ज्याचे अनुकरण जगाने केले तोच धर्म आणि तिच शिकवण आज आपल्याला नव्याने शिकावी लागते आहे ही वस्तुस्थिती आहे गणेश महाराज करंजकर यांनी परमेश्वराला वारंवार का अवतार घ्यावे लागले याविषयी विश्लेषण केले. सिन्नर तालुक्यासह इतर जिल्ह्य़ातील सेवेकरी मोठ्या संख्येने या कथा कार्यक्रमात सहभागी झाले होते. अक्कलकोटचे सुरुवातीला स्वामींची निंदा करणारे आणि स्वामीलिला पाहून स्वामी चरणी नतमस्तक झालेले ग्रामस्थ, श्री स्वामी समर्थ असा जिवंत देखावा भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला. स्वामीकथेनंतर भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. ईडीचे अधिकारी प्रफुल्ल चव्हाण , आयकर उपायुक्त भरत आंधळे यांच्याहस्ते स्वामींची महाआरती करण्यात आली. केंद्र संयोजक जयराम शिंदे यांनी सुत्रसंचालन केले.

Advertisement

 

चौकट 

त्रिदल महिला भजनी मंडळातर्फे स्वामी गीतांचा बहारदार कार्यक्रम झाला. 

स्वामी कथेसाठी परिसरासह पुणे, नाशिक येथील भाविकांची अभूतपूर्व गर्दी झाली होती. 

 

फोटो ओळी….

ठाणगाव, ता सिन्नर येथे संगितमय श्री स्वामी समर्थ चरित्रकथा कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना गणेश महाराज करंजकर

दुसर्‍या छायाचित्रात स्वामी चरित्र कथेत तल्लीन झालेला भाविकांचा जनसमुदाय

 

…….


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *