ताज्या घडामोडी

सह्याद्रीची सौंदर्यता, प्रत्येक ऋतूत मनमोहक ठरणारी; उन्हाळ्यातही पर्यटकांची पसंती


सह्याद्रीची सौंदर्यता, प्रत्येक ऋतूत मनमोहक ठरणारी;

उन्हाळ्यातही पर्यटकांची पसंती

हरसूल / देवचंद महाले

एकीकडे त्रम्बक तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये पाण्याची तीव्र टंचाई, जाणवत असतांना व कडक उन्हाच्या झळा सोसतांना, तिथं दुसरी बाजू मात्र पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे.

उंच पहाडी डोंगर रांगा, अधून मधून पर्वताच्या कुशीला चिपकलेले सुळके आणि खोल खोल दऱ्या ,तर त्यातून वाहणाऱ्या नद्या ,नि कडया कपारीतून उंचावरून फोफावणारे धबधब्याच्या नि हिरव्या गर्द झाडीने इथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांचे सह्याद्री जणू काही मांगल्याचे आणि आनंद यात्रेचे जीवनमान उंचवण्याचे आश्रय देते.

आता हिवाळा संपुष्टात, आला असून अधून मधून उन्हाची चाहूल जाणवू लागल्याने बहुतेक ठिकाणच्या नद्या नाले आटले आहेत. परंतु त्रम्बक तालुक्यातील अंबई, कलमुसते ,चिंचउतारा, येथील धबधबे बाराही महिने पर्यटकांना आकर्षित करत आहेत.तर एकीकडे जंगलातील, विविध झाडांचा मोहर,व फुलांचा दर्पण हा चोहीकडे पसरला आहे.झाडा झुडपात पक्षाचा कल्लोळ तर जणू काही संगीताचे सूर मानवी मनाला उभारी देत आहेत.इतकंच काय.अधून मधून बिबट्या, तरस. रानमांजर आणि रानडुक्कर यांच पण दर्शन होत आहे.त्या मुळे कधी वनांची भटकंती तर कधी इथून वाहत जाणाऱ्या नदी पात्रातील स्वच्छ पाण्याने भरलेला कुंडांमध्ये अंघोळ करण्याचा एक वेगळाच आनंद असतो.

Advertisement

 खर तर पावसाळ्यात जसे तुम्ही दुगारवाडी ,आणि आंबोली ,पहिने इथे भेट देता. तसेच उन्हाळ्यात, अंबई जवळील खरशा, धबधबा, मांजर कुंड,पादिर कुंड, खैरवना धबधबा, तर नाशिक आणि पालघर सीमेलगत असणाऱ्या वाघ नदीवरील निलराज धबधबा, या ठिकाणी पोहणारे यांची मज्जा काही औरच असते.या मुळे अलीकडे या ठिकाणी बाहेरील पर्यटक, व वनस्पती अभ्यासक यांची वर्दळ दिवसे दिवस वाढते आहे.

तर एकीकडे केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर जगभरातून गड किल्ले सर करण्यासाठी नामांकित ट्रेकर आपली शौर्यबाजी पणाला लावण्यासाठी येत आहेत.म्हणूनच सह्याद्रीची ही सौदर्यता.प्रत्येक ऋतुमानात आकर्षित करणारी आहे.

 

———————————————-

अंबई येथील तरुण सोमनाथ भुरबुडे.हा नियमित या ठिकाणी असलेल्या जंगलात पर्यटकांना घेऊन त्यांना मार्गदर्शन ,करतो.येथील रानवाटा, दरडी ,विविध झाडांची व परिसरातील रान माळ, गुहा, यांची माहिती देतो.तसेच आपण किती, की.मी.अंतर पायी चालू शकता.हे पर्यटक यांच्यावर्ती अवलंबून असते. त्या मुळे कधी, पाच तास तर जास्त फिरणे असले तर आठ तास पण लागू शकतात.बाकी त्याचे शुल्क, प्रत्येकी शंभर रु प्रति व्यक्ती आहे.

या खेरीज गड,किल्ले व सहयाद्रीच्या कुशीतील अल्हादायक परिसर, व वृक्ष वेलीची माहिती पर्यटकांना देत असतो.

 

पर्यावरणात काम करणाऱ्या संस्था यांचा सहभाग.

———————————————-

 

नाशिक जिल्ह्याचा पश्चिम पट्टा हा आजही पर्यटकांना भुरळ घालणारा असून, तिथे प्रत्येक ऋतुत पर्यटकांच्या संख्येत वाढ होत असून, त्याचकडून मोठ्या प्रमाणात ,प्लास्टिक, व अन्य कचरा इथे टाकला जातो.या साठी जे निर्माल्य असते त्याची विल्लेवाट लावण्यासाठी नाशिकची गडकोट संवर्धन करणारी संस्था.व विजयश्री संस्था या कार्यरत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *