ताज्या घडामोडी

पत्रकारांसाठी महामंडळ : व्हॉइस ऑफ मीडियाच्या नरिमन पॉईंट कार्यालयात जल्लोष; पत्रकारांच्या कुटुंबाचा आशीर्वाद घेण्यासाठी सतत काम करत राहू :संदीप काळे 


पत्रकारांसाठी महामंडळ : व्हॉइस ऑफ मीडियाच्या नरिमन पॉईंट कार्यालयात जल्लोष;

 

पत्रकारांच्या कुटुंबाचा आशीर्वाद घेण्यासाठी सतत काम करत राहू :संदीप काळे 

 

मुंबई प्रतिनिधी

पत्रकारांसाठी आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र महामंडळ असावे अशी मागणी गेल्या तीन वर्षापासून ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने सरकारकडे केली होती. अनेक वेळा आंदोलन उपोषण केल्यावर आज अखेर कॅबिनेट मंत्रीमंडळाने ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या मागणीला मंजुरी दिली. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ला मिळालेल्या या मोठ्या यशाचा आनंद उत्सव आज नरिमन पॉईंट येथील ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या कार्यालयामध्ये साजरा करण्यात आला. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांना ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे इंटरनॅशनल चीफ गगन महोत्रा यांनी मिठाई भरून आनंद उत्सव साजरा केला गेला. यावेळी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची संपूर्ण कार्यालयीन टीम उपस्थित होती.

Advertisement

 

गेल्या तीन वर्षांपासून हा लढा सुरु होता.राज्यात ठीक ठिकाणी आंदोलने झाली विधिमंडळ अधिवेशना दरम्यान नागपूर आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी झालेल्या आंदोलनासह व्हॉइस ऑफ मीडियाने राज्यपातळीवर तब्बल १३ आंदोलने केली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत वारंवार बैठका घेतल्या. मुख्यमंत्र्यांसोबत एकूण बारा बैठका घेतल्या. अखेर त्याचा परिणाम समोर दिसत असून मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र महामंडळ मंजूर केले. व्हॉइस ऑफ मीडियाच्या प्रत्येक शिलेदाराला त्याचे श्रेय जाते. पत्रकारांच्या कुटुंबाचा आशीर्वाद घेण्यासाठी… या ब्रीद वाक्यावर व्हॉइस ऑफ मीडिया ही संघटना भविष्यात देखील असाच संघर्ष करीत राहिल.

— संदीप काळे 

– संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष 

– व्हॉइस ऑफ मीडिया

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *