वीज वितरण कंपनी कार्यालयाबाहेर लागले वीज जोडणीचे दर पत्रक
सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय गोसावी यांच्या मागणीला अखेर यश
वीज वितरण कंपनी कार्यालयाबाहेर लागले वीज जोडणीचे दर पत्रक
सिन्नर प्रतिनिधी
3 एचपी 5 एचपी आणि सिंगल फेज कोटेशनच्या माहितीचा फलक ग्राहकांसाठी उपविभाग कार्यालयाच्या बाहेर फलक लावण्यात यावे, या आशयाची मागणी गेल्या कित्येक दिवसांपासून दत्ता गोसावी यांच्याकडून होत होती. त्या संबंधित त्यांनी वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांना वेळोवेळी निवेदनही दिले होते.गोसावी यांच्या या मागणीला अखेर यश आले असून मुख्य अभियंत्यांनी ही मागणी मान्य केली आहे.
शेतकरी बांधवांना 3 एचपी, 5 एचपी व सिंगल फेज यांची डिपॉझिट रक्कम याची माहिती सहज मिळावी. उपविभाग कार्यालय व सेक्शन ऑफिसच्या बाहेर भिंतीवरील फलकावर दर पत्रक लावण्यात यावे, सर्वसामान्य जनतेची यातून लूट होऊ नये म्हणून प्रत्येक उपविभाग व सेक्शन ऑफस कार्यालयाच्या बाहेर फलक लावण्यात यावे. असा यामागचा उद्देश आहे.
गोसावी यांनी या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस , जिल्हाधिकारी यांनाही निवेदन दिले होते.वीज वितरण कंपनीने ही मागणी मान्य करून कार्यालयाबाहेर फलक लावण्यास सुरुवात केल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.