शालेय चित्रकला स्पर्धा पुरस्कार वितरण उत्साहात संपन्न
काळिमाती, आपली दुनियादारी, कला सम्राज्ञी पवळा कलामंच आयोजित चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
राहुरीने पटकावला सर्वोत्तम सहभाग चषक, साकुर,संगमनेर, चंदनापुरीचे विद्यार्थी प्रथम पुरस्काराचे मानकरी
संगमनेर प्रतिनिधी
गोवंश संवर्धन, जतन आणि सेंद्रिय शेतीशी वचनबद्ध असलेले साप्ताहिक काळी माती,डिजिटल पोर्टल आपली दुनियादारी आणि कला सम्राज्ञी पवळा कलामंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या शालेय चित्रकला स्पर्धेचा पुरस्कार सोहळा नुकताच संपन्न झाला असून या स्पर्धेत सर्वाधिक विद्यार्थांचा सहभाग नोंदवून राहुरी येथील मुक्तांगण शाळे ने सर्वोत्तम सहभाग चषक पटकावला.
इयत्ता एक ते चार, पाच ते सात आणि आठ ते दहा या तीन विभागात ही स्पर्धा घेण्यात आली होती.लहान गटात साकुरच्या जिल्हा परिषद शाळेचा भावेश अजय शिंदे , मध्यम गटात संगमनेर येथील अमृतेश्वर विद्यालयाचा पियुष नवनाथ आनप,तर मोठ्या गटात चंदनापुरीच्या चंदनेश्वर विद्यालयाचा ऋतुजा राजेंद्र बोऱ्हाडे या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
इनोव्हेटर्सची ईश्वरी राऊतचा तिसरा क्रमांक मिळवला.
या चित्रकला स्पर्धेत इनोव्हेटर्स पब्लिक स्कुलची ईश्वरी राऊत या विद्यार्थिनीला १ ते ४ थी या गटात तिसरा क्रमांक मिळाला आहे. ईश्वरी राऊत हिचा ट्रॉफी,प्रमाणपत्र देऊन संस्थेचे सचिव नितीनचंद्र भालेराव आणि इनोव्हेटर्स पब्लिक स्कुलच्या मुख्याध्यापिका मनीषा राहणे यांनी सन्मान केला.
इनोव्हेटर्स पब्लिक स्कुलच्या विद्यार्ध्यांना मार्गदर्शन करताना संस्थेचे सचिव नितीनचंद्र भालेराव म्हणाले शालेय विद्यार्थांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी कला सम्राज्ञी पवळा कलामंच हि संस्था कार्य करत आहे.आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा भालेराव हिवरगावकर यांच्या स्मृतीचा कलेचा वारसा जतन करण्याचे काम संस्था करत आहे.शालेय विद्यार्थ्यांना लोककलेचे प्रशिक्षण दिले जाते. संस्थेमार्फत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रयोगात्मक लोककला सादरीकरणासाठी १० वाढीव गुणांची सवलत मिळते. विद्यार्थांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम,स्पर्धांचे आयोजन केले जाते. कला सम्राज्ञी पवळा कलामंच,आपली दुनियादारी यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीयस्तर चित्रकला स्पर्धेत इनोव्हेटर्स पब्लिक स्कुलच्या विद्यार्ध्यांनी मोठा प्रतिसाद दिला.त्याबद्दल संस्थेचे सचिव नितीनचंद्र भालेराव यांनी इनोव्हेटर्स पब्लिक स्कुलच्या विद्यार्ध्यांचे कौतुक केले.तसेच संस्थेच्या इतर सांस्कृतिक स्पर्धा व उपक्रमात सहभाग घेण्याचे आवाहन केले.
इनोव्हेटर्स पब्लिक स्कुलचे गोरक्ष राहणे यांनी सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे आभार मानले.यावेळी प्राचार्या मनीषा राहणे,सीईओ लक्ष्मण सहाणे,दीक्षा,अपर्णा पाटेकर,निलिमा कडलग,
पूनम गाडेकर,सुजाता काढणे,अल्नाज शेख, इ.शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी ईश्वरी राऊत व सहभागी विद्यार्थांचे अभिनंदन केले.
साकुर येथे झालेल्या कार्यक्रमांत शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षक वृंद , साकूर गावाचे सरपंच, तसेच पत्रकार सहदेव जाधव, किरण पुरी, युनूस शेख, भाजपा महिला आघाडी अध्यक्ष जाधव मॅडम उपस्थित होते.
यावेळी विविध उपक्रमात नावीन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी पत्रकार सहदेव जाधव यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि यापुढेही जास्तीत जास्त संख्येने स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
स्पर्धेतील यशाचे मानकरी :
लहान गट
प्रथम भावेश अजय शिंदे , साकुर
द्वितीय सोनाक्षी सुरेश खरात, अमृतेश्वर विद्यालय, संगमनेर
तृतीय ईश्वरी राहुल राऊत आय पी एस चंदनापुरी
उत्तेजनार्थ शाईबाज नावेद पठाण
हिवरगाव पावसामध्यम गट
प्रथम पियूष नवनाथ आनप, अमृतेश्वर विद्यालय संगमनेर
द्वितीय साई संतोष कढणे, चंदणेश्र्वर विद्यालय चंदनापुरी
तृतीय ऋतुजा अण्णासाहेब दुधवडे, अमृतेश्वर विद्यालय संगमनेर
उत्तेजनार्थ अपेक्षा विलास आहेर
अमृतेश्र्वर विद्यालय संगमनेरमोठा गट
प्रथम ऋत्तुजा राजेंद्र बोऱ्हाडे, चंदनापुरी
द्वितीय राजेश्वरी अनिल मैड, चंदणेश्र्वर विद्यालय,
तृतीय कार्तिकी गोरक्ष राहणे, चंदणापुरी
उत्तेजनार्थ प्रथमेश उल्हास गुंजाळ, अमृतेश्वर विद्यालय संगमनेर