ताज्या घडामोडी

पठारभागातील गुन्हेगारीचा पोलिसांनी बिमोड करावा – फड


पठारभागातील गुन्हेगारीचा पोलिसांनी बिमोड करावा – फड
साकुर येथील घटनेतील कुटुंबाला शासनाने मदत करून पोलिस संरक्षण देण्याची उबाठा सेनेची मागणी

रश्मी मारवाडी /संगमनेर
साकुर येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करा. अशा घटना घडू नये यासाठी पठार भागातील गुन्हेगारीचा पोलिसांनी बिमोड करा व अत्याचारीत कुटुंबाला शासनाने मदत करून आवश्यकता भासल्यास पोलिस संरक्षण द्या असे आवाहन उबाठा शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय फड यांनी केले आहे.
काही दिवसांपूर्वी घडलेल्या साकुर येथील घटनेने संगमनेर तालुक्यातच नव्हेतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी या संवेदनशील प्रकरणावर विशेष गांभीर्याने लक्ष घातले असून पठार भागातील गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उद्धव ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक,तालुका प्रमुख संजय फड यांनी पोलिसांना निवेदन देत गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कडक कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.
काही दिवसापूर्वी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. नंतर तिला आत्महत्या करण्यास कारणीभूत असलेल्या गुन्हेगारांना व त्यांना मदत करणाऱ्या साथीदारांना पोलिसांनी कायमची अद्दल घडविणे गरजेचे आहे. पोलिसांचा वचक कमी झाला असल्याने पठार भागात गुन्हेगारी वाढली

Advertisement

गुन्ह्याचा आलेख चढताच आहे. घटनेत सहभागी असलेल्या आरोपींकडून अथवा त्याच्या साथीदाराकडून पिडीत मुलीच्या कुटुंबावर दबाव आणला जावू शकतो. यामुळे शासनाने हे प्रकरण गंभीर पणे हाताळणे गरजेचे असून आर्थिक मदत करून कुटुंबाला पोलिस संरक्षण देणे गरजेचे आहे.
असे सांगुन संजय फड म्हणाले की,शिवसेना अत्याचारीत मुलीच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून पोलिसांनी गुन्हेगारांना अद्दल घडविणे आवश्यक आहे. या घटनेचा खोलवर जाऊन तपास करणे गरजेचे आहे.

“साकुर तसेच पठार भागात वाढती गुन्हेगारी चिंताजनक असून अशा प्रकारचे कृत्य माणुसकीला काळिमा फासणारे आहे. पोलिसांविषयी नाराजी पसरली आहे. जो पर्यंत आरोपींना कडक शिक्षा होत नाही, तोपर्यंत शिवसेना या प्रकरणाचा पाठपुरावा करून अत्याचारीत पिडीत मुलीच्या कुटुंबाला न्याय मिळवून देइल.”
-संजय फंड
तालुका प्रमुख
शिवसेना, संगमनेर


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *