मैत्री हे जीवनातील श्रेष्ठ मूल्य आहे- मुख्याध्यापक कुऱ्हे
मैत्री हे जीवनातील श्रेष्ठ मूल्य आहे- मुख्याध्यापक कुऱ्हे
सिन्नर प्रतिनिधी
मैत्री हे जीवनातील श्रेष्ठ मूल्य आहे. कृतज्ञता, आदर, जिव्हाळा, निस्वार्थ प्रेम, ही मैत्रीची विविध रूपे आहेत. मूल्यऱ्हासाच्या काळात मैत्रीच्या धाग्याने घट्ट बांधलेले शाळा सोबती ३७ वर्षानंतर एकत्र येतात. हे चित्र समाजात दुर्मिळ होत चालले आहे. कुठल्याही लाभाशिवाय मित्राचा गौरव करण्यासाठी एकत्र येणे हा आदर्श मैत्रीचा वस्तूपाठ आहे असे मत माजी मुख्याध्यापक जगन्नाथ कुऱ्हे यांनी व्यक्त केले.
कोमलवाडी येथील भूमिपुत्र आणि पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक रवी टेमगर यांच्या जयवंत ऑर्किड या फार्म हाऊसवर कवी किरण भावसार यांच्या सत्कार प्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक दिलीप देवरे, वखार महामंडळाचे सेवानिवृत्त कर्मचारी भाऊसाहेब टेमगर, विमा प्रतिनिधी राम चव्हाणके, आदी उपस्थित होते.
पुणे येथील पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचा नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार किरण भावसार यांच्या घामाचे संदर्भ या कविता संग्रहाला जाहीर झाल्यानिमित्त भावसार यांच्या वर्ग मित्रांनी हा सत्कार सोहळा आयोजित केला होता.
शालेय जीवनातील मैत्रीतील जिव्हाळा स्नेह आयुष्यभर जगण्याला बळ देत राहतो. संकटांना धैर्याने सामोरे जाण्याची शक्ती आणि ऊर्जा खऱ्या मैत्रीतून लाभते असे मत माजी मुख्याध्यापक दिलीप देवरे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. मित्रांचे ऋण हे परतफेड करण्यासारखे नसतात. मित्र हीच आपली मोठी संपत्ती आहे असे मत सत्काराला उत्तर देताना किरण भावसार यांनी व्यक्त केले. याप्रसंगी भाऊसाहेब टेमगर, गोरख चव्हाणके, शरद कांदळकर, शामराव खुळे,दीपक खुळे, उद्धव ठोक, रोहिदास चव्हाणके, रवी टेमगर, सूर्यचंद खुळे, राजाराम खुळे, गंगाधर वाजे, निवृत्ती ठोक, आदींनी मनोगत व्यक्त केले. रामनाथ घुले यांनी कवी नारायण पुरी यांची कविता तसेच कवी रामदास फुटाणे यांच्या वात्रटिका सादर करत रंगत वाढवली.
सर्व मित्रपरिवाराच्यावतीने जगन्नाथ कुऱ्हे आणि दिलीप देवरे या दोन्ही गुरूवर्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. टेमगर कुटुंबियांनी विठ्ठल आणि सरस्वती मुर्ती देऊन किरण भावसार यांचा सत्कार केला.
नवनाथ खुळे, सुरेश खुळे, पांडुरंग बकरे, खंडू बोंबले, रामभाऊ भोर, नंदू कुलकर्णी, सतीश कडवे, माणिक कडवे, किशोर तुपे, काशिनाथ गीते,वाल्मीक गीते, भास्कर कोकाटे, एकनाथ मुरडनर, शशिकांत घुले वर्गमित्र यावेळी उपस्थित होते. भीमराव आढांगळे यांनी प्रास्ताविक केले. राम चव्हाणके यांनी सूत्रसंचालन केले. आभार जयश्री टेमगर यांनी मानले.