धुळे ग्रीन वृक्ष टीम व जन्मबंध ग्रुप यांच्या वतीने जागतिक निसर्ग संवर्धन दिन 51 वृक्षांचे वृक्षारोपण
धुळे ग्रीन वृक्ष टीम व जन्मबंध ग्रुप यांच्या वतीने जागतिक निसर्ग संवर्धन दिन 51 वृक्षांचे वृक्षारोपण
वृत्त प्रतिनिधी- धनंजय गाळणकर
वाढणाऱ्या तापमानावर उपाय व पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष लागवडीची गरज आहे. त्यासाठी लोकसहभाग गरजेचा आहे. कोरोना च्या संकटात ऑक्सिजनची पडलेली गरज व शहराचे गेलेले 45 डिग्री तापमान हे लक्षात घेता अधिकाराधिक वृक्षारोपण झाले पाहिजे हे लक्षात घेता जन्मबंध ग्रुप व धुळे ग्रीन वृक्ष टीम यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षीही 51 वृक्षांचे वृक्षारोपण दोंदे कॉलनी परिसरातील नागरिक व जन्मबंध समाप्त टीमच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. धुळे ग्रीन वृक्ष टीमचे ललित ललितभाऊ माळी ,नानासाहेब उत्तमराव पाटील, चेतनभाऊ जडे, महेंद्र सोनार (जन्मबंधाचे प्रमुख), परमार शेठ, सिद्धेश नाशिककर ,सोनीताई सोनार यांच्या हस्ते वृक्षारोपणाची सुरुवात झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
महेंद्र सोनार (जन्मबंधाचे प्रमुख), निंबा सेठ सोनार,प्रदीप दादा बिरारी, रमेश अण्णा बिरारी, सुनील दुसाने, दिगंबर विसपुते, विजयानंद मोरे, सर ,प्रकाश बाविस्कर ,मनोज घोडके, नरेंद्र घोडके, अनिल पिंगळे विलास विसपुते , चेतन जडे,अरुण विसपुते सर ,चंद्रशेखर विसपुते, कृष्णा सोनार पोद्दार रावसाहेब, महेश महाले, मन्साराम माळी सर, राजू देव,संदीप सोनार, विजय पिंगळे ,दिलीप वाघ, शरद सोनार ,सुनिता सोनार ,सोनाली महाले , वैशाली पाटील,भारती घोडके , मोठ्या संख्येने सुवर्णकार बांधव व दोंदे परिसरातील नागरिक वृक्षारोपण कार्यक्रमात उपस्थित होते.