आध्यात्मिक शक्ती ओळखून ती आत्मसात केल्यास जीवनाचे सार्थक झाल्याशिवाय राहणार : गणेश महाराज करंजकर
आध्यात्मिक शक्ती ओळखून ती आत्मसात केल्यास जीवनाचे सार्थक झाल्याशिवाय राहणार : गणेश महाराज करंजकर
ठाणगाव, :
कलीयुगात संस्कारक्षम पिढी घडविणे ही काळाची गरज बनली आहे. स्वामींना जपा स्वामी तुम्हाला जपल्याशिवाय रहाणार नाही असा संदेश गणेश महाराज करंजकर यांनी दिला. ठाणगाव (ता. सिन्नर ) येथे श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक व बालसंस्कार केंद्रातर्फे आयोजित श्री स्वामी समर्थ संगितमय चरित्रकथा कार्यक्रमात ते बोलत होते. पाश्चिमात्य संस्कृतीमुळे नवी पिढी संस्कार विसरली आहे. संस्कार नसल्याने संपूर्ण पिढी दु:खी, व्यसनी बनुन अनेक संकटाशी झगडत आहे, योग्य वेळी संस्कार मिळाले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल. विश्वाचे चालक, मालक श्री स्वामी समर्थ आहेत. विश्वासाने सेवा मार्गात आल्यास सर्व अडचणी दुर होतील. असे गणेश महाराज यांनी विविध दृष्टांतातून सांगितले. सिन्नर तालुक्यासह अहमदनगर, पुणे, ठाणे आधी जिल्ह्य़ातील सेवेकरी मोठ्या संख्येने या कथा कार्यक्रमात सहभागी झाले होते.
स्वामी समर्थ सेवा कथेच्या आजच्या शेवटच्या दिवशी विरहाच्या विचाराने अनेक भाविकांचे डोळे पाणावले.
स्वामीकथेनंतर भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. विविध मान्यवरांच्या हस्ते स्वामींची महाआरती करण्यात आली केंद्र संयोजक जयराम शिंदे यांनी सुत्रसंचालन केले.
चौकट
*श्री स्वामी समर्थ चरित्रकथा कथा संपूर्ण गावासाठी आपल्या घरातील जिव्हाळ्याचा ठरला गावातील ६० ते ७० टक्के लोकांच्या घरी आप्त व नातेवाईकांचा राबता राहिला. शेवटच्या दिवशी भाविकांच्या अभूतपूर्व गर्दीची चर्चा संपूर्ण पंचक्रोशीत होती.*आयकर विभागाचे अॅडिशनल कमिशनर भरत आंधळे यांनी एक हजार वृक्ष सेवेकऱ्यांसाठी दान देण्यात आले.
*स्वामी गितांवर अबालवृध्दांनी नाचण्याचा तसेच उघड्या खेळण्याचा आनंद घेतला.
फोटो ओळी….
ठाणगाव, ता सिन्नर येथे संगितमय श्री स्वामी समर्थ चरित्रकथा कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना गणेश महाराज करंजकर
दुसर्या छायाचित्रात स्वामी समर्थांचा जीवंत देखावा सादर करतांना कलाकार.
…….