व्यसन आणि फॅशनमुळे हिंदू धर्म आणि संस्कृतीची अवहेलना होत आहे : गणेश महाराज करंजकर
व्यसन आणि फॅशनमुळे हिंदू धर्म आणि संस्कृतीची अवहेलना होत आहे : गणेश महाराज करंजकर
ठाणगाव, :
मनुष्य जन्म दुर्लभ आहे, मात्र व्यसन आणि फॅशनच्या नावाखाली पाश्चिमात्य संस्कृती वाढते आहे परिणामी फक्त हिंदू समाजाच्याच माता, भगिनी संकटात सापडत आहे भारतिय संस्कृतीचा पुन्हा अंगिकार करण्याची गरज निर्माण झाली आहे असे मत गणेश महाराज करंजकर यांनी व्यक्त केले. ठाणगाव (ता. सिन्नर ) येथे श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक व बालसंस्कार केंद्रातर्फे आयोजित श्री स्वामी समर्थ संगितमय चरित्रकथा कार्यक्रमात ते बोलत होते.
मन ताब्यात येण्यासाठी नमन केल्याशिवाय पर्याय नाही. परमेश्वराकडे काहीही मागताना दुसऱ्यासाठी मागा आपल्या जीवनात काहीही कमी पडणार नाही. आध्यात्मावर सर्वांचा समान अधिकार आहे समर्थांच्या इच्छेत मिळून रहा. आपल्या हातून कुणाची अवहेलना करु नका, मुलगा, मुलगी असा भेद करु नका असे गणेश महाराज यांनी विविध दृष्टांतातून सांगितले. सिन्नर तालुक्यासह अहमदनगर, पुणे, ठाणे आधी जिल्ह्य़ातील सेवेकरी मोठ्या संख्येने या कथा कार्यक्रमात सहभागी झाले होते.
हिमालयातील साधूंचे गर्वहरण व श्री स्वामी समर्थ असा जिवंत देखावा भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला. स्वामीकथेनंतर भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. कर्नल मच्छिंद्र शिरसाठ व विविध मान्यवरांच्या हस्ते स्वामींची महाआरती करण्यात आली केंद्र संयोजक जयराम शिंदे यांनी सुत्रसंचालन केले.
चौकट
सिन्नरच्या कानडीमळा येथील स्वामी समर्थ सेवा केंद्रातील चिमुकल्यांनी विविध धार्मिक गीतांवर सादर केलेले नृत्य लक्षवेधी ठरले.
आयकर विभागाचे अॅडिशनल कमिशनर भरत आंधळे यांनी एक हजार वृक्ष सेवेकऱ्यांसाठी दान दिले.
फोटो ओळी….
ठाणगाव, ता सिन्नर येथे संगितमय श्री स्वामी समर्थ चरित्रकथा कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना गणेश महाराज करंजकर
दुसर्या छायाचित्रात स्वामी चरित्र कथेत तल्लीन झालेला भाविकांचा जनसमुदाय
…….