अठ्ठ्याऐंशी वर्षीही काकड बाबा जपताय पर्यावरणाशी नाते
अठ्ठ्याऐंशी वर्षीही काकड बाबा जपताय पर्यावरणाशी नाते
सिन्नर प्रतिनिधी
ठाणगाव येथील प्रगतशील शेतकर, राधाकिसन सावळीराम काकड …बाबाचं वय 88 वर्ष ,या वयातही काळ्या मातीशी असलेला जिव्हाळा त्यांना स्वस्थ बसू देत नाही . काळी माती हेच त्यांचं विश्व.त्यातूनच ठाणगाव परिसरात नायकाचा वहाळ या भागात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लावण्यात त्यांनी स्वारस्य दाखवले . आंबा, चिंच, चिक्कू, निम, अंजीर ,फणस सिताफळ ,नारळ पेरू, अशा विविध प्रकारचे वृक्षारोपण केले. राधाकिसन सावळीराम काकड व त्यांच्या कार्याला मोलाची साथ त्यांच्या पत्नी सौ कौसाबाई यांनी दिली. बाबांनी आपले मनोगत व्यक्त केले
वृक्ष का लावावेत यावर बाबा सांगतात की,, आपल्या परिसरात रान पाखरं फिरत असतात, वृक्षतोड दिवसेंदिवस वाढत आहे,त्यामुळे तापमान प्रचंड वाढत आहे.पाऊसही दिवसेंदिवस कमी होत आहे.त्याचा परिणाम मानव आणि एकूणच जीवसृष्टीवर होतो.पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे .
गावातील प्रत्येक कुटुंबांने आपली जबाबदारी म्हणून किमान वर्षाला पाच ते दहा झाडे लावावीत ,ती जगवावी जेणेकरून आपला परिसर सुंदर दिसेल.पर्यावरणाचा समतोल राखला जाईल.जीवसृष्टी वाढेल. सृष्टी चक्र पूर्ण होईल.आत्तापर्यंत मी 700 ते 800 वृक्ष लावले आहेत . त्यांचे मुंबई पोलीस दलातील मुलगा बाळासाहेब काकड हे वेळोवेळी सुट्टी काढून वृक्षांच्या भोवती असलेले गवत काढून व झाडांना पाणी घालून त्यांना जगविण्याचा प्रयत्न करतो.विशेष म्हणजे या 700 पैकी सर्वच्या सर्व झाडे जगलेली असून त्यांची वाढ सुद्धा चांगल्या प्रमाणे होत आहे . ठाणगाव परिसरात, वृक्ष लागवड करताना राधाकिसन सावळीराम काकड यांना , त्यांची पत्नी कौसाबाई काकड राजेंद्र मंडोळ, सकाराम बर्डे, आदींनी वृक्ष लावण्यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे.