ताज्या घडामोडीसामाजिक

राघोजी भांगरे शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप 


राघोजी भांगरे शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप 

 

सिन्नर प्रतिनिधी 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा औंढेवाडी (गावठा) शाळेत आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे बहुउद्देशिय सेवा संस्थेच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. अनेक खेड्यापाड्यातील परिस्थिती बघून असे लक्षात येते की शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना त्यांच्या संपूर्ण शाळेय साहित्य मिळत नसल्याकारणाने व परिस्थिती अभावी मुलांचे शिक्षण पूर्ण होत नाही.कुटुंबाच्या नाजूक आर्थिक परिस्थितीमुळे मुलांना पुरेपूर सुविधा मिळत नसल्याने आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे बहुद्देशीय सेवा संस्थेचे अध्यक्ष गंगाराम तळपाडे दरवर्षी मुलांना शाळेत साहित्य स्वखर्चाने देत असतात त्याच प्रमाणे यावर्षी देखील शाळेच्या व अंगणवाडीच्या सर्व विद्यार्थ्यांना वह्या,अंकलिपी,पेन,पेन्सिल,खोडरबर,पाटी असे उपयोगी साहित्य वाटण्यात आले.याप्रसंगी संस्थेचे गंगाराम तळपाडे,आदिवासी युवा नेते तुकाराम मेंगाळ, भांगरे काका,लक्ष्मण खराटे व किरणभाऊ लोहकरे आदी पदाधिकारींच्या सहयोगाने साहित्य वाटप झाले.प्रमुख पाहुण्यांचे शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले.

Advertisement

 

याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नागेशभाऊ कुंदे,ग्रामपंचायत सदस्य काशिनाथ कोरडे,मुख्याध्यापक अण्णासाहेब सांगळे,युवा नेते सह्याद्री प्रदेशाध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद जनार्दनभाऊ कुंदे,मारुती कुंदे,सचिन कुंदे, साहेबराव कुंदे,राजू कुंदे, गणेश कुंदे,तुषार कुंदे,अरुण कुंदे,नारायण कुंदे,गोरख कुंदे,प्रकाश कुंदे,शिवाजी कुंदे,तुकाराम कुंदे,भिमा कुंदे,गणपत बेंडकोळी आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक अण्णासाहेब सांगळे यांनी तर आभार मदन सोनवणे यांनी मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *