चिंचोली माध्यमिक विद्यामंदिरचा वेदांत शालेय कुस्ती स्पर्धेत तालुक्यात अजिंक्य
चिंचोली माध्यमिक विद्यामंदिरचा वेदांत शालेय कुस्ती स्पर्धेत तालुक्यात अजिंक्य
सिन्नर प्रतिनिधी
चिंचोलीच्या माध्यमिक विद्यामंदिरचा वेदांत तुकाराम उगले,या विद्यार्थ्याने, सिन्नर तालुका शालेय कुस्ती स्पर्धेत 60 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे.त्याची जिल्हा स्तरावर निवड झाली आहे. यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. एल. अलगट , जी . व्ही.गिते , एम. टी. गायकवाड,एम. आर. ,डी. आर.लोखंडे या शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, उपाध्यक्ष उदय घुगे, सरचिटणीस हेमंत धात्रक,सहचिटणीस दिगंबर गीते, सर्व विश्वस्त , सर्व संचालक, संस्थेचे संचालक समाधान शांताराम गायकवाड , विद्यालयाचे चेअरमन भास्कर उगले, उपाध्यक्ष दिलीप सानप , सर्व सदस्य , संस्थेचे माजी संचालक शांतारामभाऊ गायकवाड , चिंचोली गावचे सर्व ग्रामस्थांनी वेदांतचे अभिनंदन केले.