सिन्नर येथे *किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन* शिबिर
सिन्नर येथे *किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन* शिबिर
सिन्नर प्रतिनिधी
माध्यमिक लोकशिक्षण मंडळ संचलित एस जी पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज सिन्नर येथे इयत्ता पाचवी ते बारावीच्या कुमारवयीन मुलींसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. गतिमान काळानुसार बदलत चाललेली जीवनशैली व वाढत्या वयानुसार होणारे शारीरिक व मानसिक बदल, बदलानुरूप सामाजिक व कौटुंबिक समायोजन,मुलींच्या संरक्षणार्थ असणारे कायदे, सामाजिक प्रलोभनांना बळी न पडण्याचे आवाहन, Good Touch & Bad Touch. अशा स्त्री जीवन विषयक अनेक पैलुंवर चर्चात्मक मार्गदर्शन करण्यासाठी श्रीमती शोभा पवार,सदस्य -बाल न्याय मंडळ नाशिक यांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून निमंत्रित करण्यात आले होते, याप्रसंगी व्यासपीठावर, संस्थेचे अध्यक्ष माननीय अण्णासाहेब गडाख , माध्यमिक विभागाचे प्राचार्य एस एल चौधरी तसेच इंग्रजी विभागाच्या प्राचार्य श्रीमती अनिता कांडेकर ह्या उपस्थित होत्या.किशोरवयीन मुलींसमोर शालेय जीवनात उद्भवणाऱ्या समस्या, ताणतणाव तसेच सामाजिक जबाबदारी व संस्कार यासोबतच शारीरिक व मानसिक स्वास्थ्य जपने ही मुलींसमोरील सर्वात मोठी समस्या असते मात्र दैनंदिन जीवनात लावून घेतलेल्या चांगल्या सवयी आहार विहार यासोबत साधे सुलभ व्यायामप्रकार करून आपण आपले शारीरिक व मानसिक संतुलन अबाधित राखू शकतो असे त्यांनी बोलतांना सांगितले, याशिवाय शालेय व सामाजिक जीवनात अनिश्चित व असुरक्षित प्रसंगी तात्काळ मदत भेटण्यासाठी विविध महिला हेल्पलाईन नंबर्स उपलब्ध आहेत त्यांची मुलींना ओळख करून देण्यात आली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संकुलतील प्राध्यापिका कोळपे ,सातपुते, खरणार तसेच श्रीमती प्रियंका देवकर, शितल चिने, स्वाती देशमुख, प्रमिला चिने, रोहिणी तुपे,शितल कुशारे, वंदना तांबे, कोमल मोगल, स्वाती पाबळे, या सर्व महिला शिक्षिका यांनी परिश्रम घेतले.ज्युनियर विभागाच्या प्राध्यापिका श्रीम पुष्पा जाधव यांनी सूत्रसंचालन केले विद्यालयातील सखी-सावित्री व विशाखा समितीने कार्यक्रमाचे नियोजन केले तर श्रीमती अनिता कांडेकर यांनी आभार प्रदर्शन केले