दरोडयाच्या गुन्हयातील फरार आरोपीच्या गुन्हे शाखा युनिट-१ ने बांधल्या मुसक्या
दरोडयाच्या गुन्हयातील फरार आरोपीच्या
गुन्हे शाखा युनिट-१ ने बांधल्या मुसक्या
नाशिक प्रतिनिधी
आयुक्तालयातील गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने उपनगर पोलीस ठाण्यात २१३/२०२४ भा.न्या.सं. कलम ३१० (४), (५) सह म.पो. का कलम १३५ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यातील एका फरार आरोपीच्या मुसक्या बांधल्या आहेत.
या गुन्हयातील इतर आरोपीतांचा शोध घेण्याच्या सूचना पोलिस आयक्तांनी दिल्या होत्या.
त्याअनुषंगाने गुन्हेशाखा युनिट १ चे पोलीस अधिकारी व अंमलदार पाहिजे आरोपीतांचा शोध घेत असतांना पोहवा प्रविण वाघमारे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सचिन मधुकर तोरवणे हा पिंपळगाव लेप ता. येवला जि. नाशिक या गावात आहे ही माहिती वपोनि मधुकर कड यांना कळविली असता त्यांनी दिलेल्या आदेशान्वये पोउनि रविंद्र बागुल, पोहवा प्रविण वाघमारे, पोहवा प्रदिप म्हसदे, पोहवा प्रशांत मरकड, पोहवा विशाल काठे, पोहवा संदिप भांड, पोना विशाल देवरे यांच्या पथकाने पिंपळगाव लेप या गावी जावुन तेथे सदर आरोपीतांचा शोध घेतला असता तो खंडेराव मंदिराजवळ मिळून आला. त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव गाव याविषयी खातरजमा केल्यानंतर हवा असलेला आरोपी तोच आहे याची खात्री होताच त्याची विचारपूस केल्यानंतर, त्याने गुन्हयाची कबुली दिल्याने आरोपीतास पुढील कारवाई कामी उपनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगीरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हेशाखा, संदिप मिटके, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सपोनि हेमंत तोडकर, पोउनि रविंद्र बागुल, पोहवा प्रविण वाघमारे, प्रदिप म्हसदे, प्रशांत मस्कल, विशाल काठे, संदिप भांड, पोना विशाल देवरे, पोअं जगेश्वर बोरसे यांच्या पथकाने केली.