क्राईम

मिळालेली खाकी वर्दी ही समाजाच्या हितासाठी;  पोलिस उप आयुक्त चंद्रकांत खांडवी कल्याणी महीला सेवाभावी संस्था व गरुड झेप अकॅडमीचा पोलिस शौर्याला सलाम


मिळालेली खाकी वर्दी ही समाजाच्या हितासाठी;

 पोलिस उप आयुक्त चंद्रकांत खांडवी

 

कल्याणी महीला सेवाभावी संस्था व गरुड झेप अकॅडमीचा पोलिस शौर्याला सलाम

 

☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️

           मराठी संस्कृती जतन  करा 

…………………………,……………………………………….

नाशिक प्रतिनिधी

पोलिस प्रशासनात काम करत असताना समाजाप्रती समर्पणाची भावना हि खाकी वर्दी परिधान केल्या पासूनच पोलिसांच्या मनात असते. आज या खाकीचा सन्मान होतोय ही अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन पोलीस उप आयुक्त चंद्रकांत खांडवी यांनी सलाम पोलीस शौर्याला या कार्यक्रमाप्रसंगी केले.

…………

दिडशे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान

गंगापूर डॅमच्या बाजूला असलेल्या गरुडझेप अकॅडमीच्या कॅम्पस मध्ये सायंकाळच्या वेळी निसर्गरम्य वातावरणात संगीतमय कार्यक्रमाने सलाम पोलीस शौर्याला या सन्मान सोहळ्याचे आयोजन प्रसंगी पोलीस शिपाया पासून ते पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी आपल्या परिवारासह हजेरी लावून या सोहळ्याचा आनंद घेत समाधान व्यक्त केले.

………

Advertisement

गरुड झेप अकॅडमीच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त कल्याणी महीला सेवाभावी संस्था व गरुड झेप अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 18 शनिवार रोजी सायंकाळी पाच वाजता गंगापूर रोड येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पोलिस प्रशासनात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सलाम “पोलीस शौर्याला खाकी वर्दीला” हा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी उपायुक्त खांडवी म्हणाले की,पोलिस समाजाप्रती कर्तव्य बजावत असताना पूर्णवेळ समर्पणाची भावना मनात बाळगून काम करत असतो. हे काम करत असताना अनेक अडचणींना संघटना आम्हाला सामोरे जावे लागते परंतु कर्तव्य प्रथम या दृष्टिकोनातून आम्ही काम करत असतो. या कामाची पोहोच पावती म्हणून, हा आगळावेगळा पोलिसांसाठी सन्मान सामाजिक संस्थांकडून आयोजित करण्यात आल्यामुळे आम्हाला काम करण्यासाठी नेहमी हा सन्मान प्रेरणा देत राहील. यावेळी महिला व बालविकास अधिकारी सुनिल दुसाने यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की,पोलिस प्रशासनात कामाचा व्याप हा खूप जास्त असल्याकारणाने दैनंदिन जिवनामध्ये दररोज योग करणे गरजेचे आहे.यामुळे मन प्रसन्न होते.तसेच काम करत असताना थकवा जाणवत नाही. प्रसंगी गरुड झेप अकॅडमीचे संस्थापक प्रा डॉ एस एस सोनवणे कल्याणी संस्थेच्या डॉ सुनिता मोडक यांच्यासह पोलीस उप अधिक्षक वासुदेव देसले,व.पो.नि. मधुकर कड,व. पो.नि.रणजीत नलावडे, व.पो.नि.सुनिल पवार,व.पो.नि.गजेंद्र पाटील, व.पो.नि.जितेंद्र सपकाळे, व.पो. नि. अतुल डहाके,व पो नि सत्यजित आमले,पो. नि ज्योती आमने, पो नि सुरेखा पाटील,पो नि तृप्ती सोनवणे, पो नि विश्वास पाटील आदींसह मोठ्या संख्येने अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन आरती शिरवाडकर यांनी केले तर आभार प्रा गणेश गाढे यांनी मानले.

 

 

 

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *