नासिक तालुका मराठी पत्रकार संघ, दक्ष न्युज आणि कर्तव्य दक्ष फाऊंडेशन यांचा कार्य सन्मान पुरस्कार सोहळा दिमाखात
नासिक तालुका मराठी पत्रकार संघ, दक्ष न्युज आणि कर्तव्य दक्ष फाऊंडेशन यांचा कार्य सन्मान पुरस्कार सोहळा दिमाखात
नासिक प्रतिनिधी
नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ (रजि.) संलग्न नाशिक तालुका मराठी पत्रकार संघ, कर्तव्यदक्ष फाउंडेशन व दक्ष न्यूज यांच्या वतीने कार्यसन्मान पुरस्कार सोहळा संपन्न झाला. यंदाचे हे 28 वे वर्ष होते. सालाबादप्रमाणे प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल माध्यमांतील २८ पत्रकार तसेच विविध सामाजिक कार्य करणाऱ्या १३ व्यक्तींचा गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम शनिवार, 18 जानेवारी 2025 रोजी सातपूर येथील नाइस सभागृहात पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, दैनिक पुढारीचे संपादक मिलिंद सदगुरे, श्रीराम शक्ती पिठाचे महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज, हिंदू एकता आंदोलन पक्षाचे अध्यक्ष रामसिंग बावरी, नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस दिनेश ठोंबरे, कुमार कडलग, श्रद्धा दुसाने, आशा पाटील व संगीता गायकवाड, सुनील परदेशी, करणसिंग बावरी यांच्या सह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
संपादन क्षेत्रात तब्बल ५५ वर्षांचा प्रदीर्घ व सर्वसमावेशक योगदानाबद्दल ज्येष्ठ पत्रकार किशोर फडे मामा यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले.
प्रिंट मीडियामधील उल्लेखनीय योगदानाबद्दल कार्यसन्मान पुरस्कार देऊन पत्रकार रामभाऊ आवारे, सतीश परदेशी, सुधीर पेठकर दै. नवराष्ट्र, रवींद्र केडिया दै. देशदूत, वसंत आव्हाड दै. पुण्यनगरी, मनोज घोने दै. दिव्य मराठी, गोकुळ सोनवणे दै. लोकमत, सतीश निकुंभ दै. सकाळ, सागर आनप दै. पुढारी, नामदेव पवार दै. महाराष्ट्र टाइम्स, मच्छिंद्र बोरसे दै. आपला महानगर, अश्विनी पांडे दै. गावकरी, चंद्रशेखर गोसावी दै. हमारा महानगर, दिनेश जाधव दै. लोकनामा, मुकुंद बाविस्कर दै. भ्रमर, संजय परदेशी स्पा. नाशिक खबर, योगेश रोकडे दै. लोकमंथन भैय्यासाहेब कटारे दै. महासागर यांच्या सोबत इलेक्ट्रॉनिक व डिजिटल मीडियातून उत्कृष्ट कार्य करणारे पत्रकार संतोष लचके नाशिक लोकशाही न्यूज, दिनेश पगारे दक्ष न्यूज, रश्मी मारवाडी आपली दुनियादारी, ज्ञानेश्वर आंधळे नाईन न्यूज, अमर सोळंके मी नाशिककर न्यूज, अभिषेक ताकाटे एनसीएन न्यूज, अविनाश पाटील दक्ष पोलीस न्यूज, ज्ञानेश्वर तुपसुंदर DKD News, अनिल केदारे भारत माझा न्यूज यांचे सन्मान करण्यात आला.
तसेच सामाजिक योगदानाबद्दल निलीनी मधुकर कड, पोलीस अंमलदार रोशनी अशोक भामरे व जयंत धनाजी जाधव, पी.आय.रंजीत नलावडे, दिनेश पाटील, डॉ. सौ. ज्योती शिंदे केदारे, अश्विनी देवरे मॅडम, गजानन माधव देवचके, सुहासिनी घोडके, राजेश रत्नपारखी व शैलेश पंडित, सौ. मिनाक्षी जगदाळे, रिना गजरमल यांच्या सन्मान करण्यात आला.
पुरस्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष करणसिंग बावरी, कार्याध्यक्ष लियाकत पठाण, उपाध्यक्ष पंकज पाटील, सुनीता पाटील, सरचिटणीस संजय परदेशी, संघटक भैय्यासाहेब कटारे, सहसंघटक दिनेश पगारे, समन्वयक विश्वास लचके यांसह अनेक पदाधिकारी व सदस्यांनी अधिक परिश्रम घेतले. या पुरस्कार सोळ्यास कर्तव्यदक्ष फाउंडेशन व के.पी. एम फाउंडेशन संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. या सोबत गणेशोत्सव घरगुती आरास स्पर्धा २०२४ बक्षीस वितरण समारंभ व कर्तव्यदक्ष फाउंडेशनचा पहिला वर्धापन दिन सोहळा थाटामाटात संपन्न झाला. या भव्य दिव्य कार्यक्रमाला शेकडोच्या संख्येने नाशिककरांनी उपस्थिती लावली.



