कराटे स्पर्धेत जेलरोडच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; प्रिया कोकाटेने कमावली सायकल
कराटे स्पर्धेत जेलरोडच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश;
प्रिया कोकाटेने कमावली सायकल
☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️
मराठी संस्कृती जतन करा
…………………………………………..
नाशिक प्रतिनिधी
नाशिकमध्ये मीनाताई ठाकरे स्टेडियम पंचवटी येथे वर्ल्ड ट्रॅडिशनल शोतोकान कराटे फॅड्रेशन ,महाराष्र्ट यांच्या वतीने आयोजित केलेल्या ६व्या आझाद कप कराटे चॅम्पियनशिप सन २०२५ स्पर्धेत छञपती शिवाजी महाराज ईनडोर स्टेडियम ,आढाव नगर, जेलरोड नाशिकरोड येथील डब्लू टी एस सी एफ कराटे क्लासने घवघवीत यश प्राप्त केले. यामध्ये विहान देवरे ईश्वरी कुशारे प्रथमेश कपोते आरोही तेवरे आराध्या बटू वैष्णवी शिरोळे विशाखा जाधव अथर्व सोनवणे या सर्वांनी सुवर्ण मेडल पटकावले.याचबरोबर क्लासच्या 25 विद्यार्थ्यांना पण सिल्वर मेडल ब्रांझ मेडल मिळाले. स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्रिया कोकाटे हिला सायकल बक्षीस देण्यात आली. या सर्वांना कराटे क्लासचे शिक्षक अक्षय शिंदे तसेच सचिन पवार यांचे मार्गदर्शन लाभले.