क्राईम

सरळगाव बाजार ठरतो जीवघेणा! कोंडीमुळे वाहन चालक हैराण ! बाजाराला पर्यायी जागेत स्थलांतर करण्याची मागणी!


सरळगाव बाजार ठरतो जीवघेणा! कोंडीमुळे वाहन चालक हैराण ! बाजाराला पर्यायी जागेत स्थलांतर करण्याची मागणी!

☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️

        मराठी संस्कृती जतन करा 

,……………………,……………….

बाळासाहेब भालेराव /मुरबाड 

 

कल्याण – अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील मुरबाड तालुक्यातील स्वतंत्र काळातील नावाजलेला सरळगावचा आठवडी बाजार वाहतूक कोंडीमुळे चर्चेत आला आहे दर मंगळवारी भरणाऱ्या या बाजारात वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक पुरते हैराण झाले आहेत. हा बाजार पर्याय जागेत स्थलांतरित करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे . तसेच प्रमुख सरळगाव बाजारपेठ रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूने भरत असल्याने हा बाजार ठरत आहे जीवघेणा यावर तात्काळ उपयोजना करण्याची मागणी वाहन चालक, ग्राहक तसेच माळशेज घाट जाणाऱ्या प्रवाशांनी केली आहे.

देशातील प्रमुख राष्ट्रीय महामार्गामध्ये समावेश करण्यात आलेल्या कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर मुरबाड तालुक्यात मुरबाड पासून बारा किलोमीटर अंतरावर आठवणी बाजार भरत आहे अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतरची या बाजारपेठेत होणारी वाहतूक कोंडी दूर होऊ शकलेली नाही विशेष बाब म्हणजे माळशेज घाट मार्गे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या बस गाड्या याच रस्त्यातून मार्गस्थ होत असतात अहमदनगर, नांदेड, परभणी, लातूर, धाराशिव, आंबेजोगाई, बीड, जालना, अशा महाराष्ट्रात अनेक बस गाड्या यास मार्गातून जात असल्याने आठवडी बाजारामुळे विलंबाने धावत असतात सरळगावच्या आसपास अनेक मोकळ्या जागा आहेत त्या मोकळ्या जागेमध्ये हा बाजार स्थलांतरित करण्याची मागणी येथे स्थानिक नागरिकांकडून होत आहे परंतु ग्रामपंचायत प्रशासन याकडे मात्र गांभीर्याने घेत नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून ऐकायला मिळत आहेत. वाहतूक शाखा ही या बाबीकडे पाहिजे तितकेसे गांभीर्याने घेत नसल्याच्या तक्रारी वाहन चालकांकडून केल्या जात आहेत. एकंदरीत स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ ग्रामपंचायत, प्रशासन तहसीलदार कार्यालय यांच्या समन्वय बैठकीने हा तोडगा निघू शकतो अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

Advertisement

विशेष बाब म्हणजे सरळ गावच्या आठवडी बाजारासाठी किंवा या बाजारपेठेमध्ये अजून पर्यंत ग्रामपंचायत प्रशासनाकडून सार्वजनिक शौचालयाची सोय नसल्याने येथे येणाऱ्या नागरिकांची मोठी कुचंबाना होत आहे विशेषतः महिला वर्गाला याचा सर्वात जास्त त्रास सहन करावा लागत आहे इतक्या वर्षापासून सुरू असलेल्या हो बाजारपेठेचे मुख्य ठिकाण असलेल्या सरळगाव येथे सार्वजनिक शौचालय अथवा मुतारी नसल्याने ग्रामपंचायत प्रशासनाचे वाभाडे निघत आहेत.

****

“देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून व तिच्याही आधीपासून मुरबाड तालुक्यातील अतिशय नावाजलेला सुरुवातीला बैल बाजार त्यानंतर भाजीपाल्याची आवक निर्माण करणारा हा बाजार तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहे परंतु अशा नावाजलेल्या सरळगावचा आठवडी बाजाराला रस्त्याच्या दुतर्फा भरवण्याची नामुष्की दुकानदारावर येत असते पुणे, अहमदनगर व अन्य ठिकाणातून व्यापारी या बाजारात येत असतात. परंतु राष्ट्रीय महामार्ग लगतच हा बाजार भरत असल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी होते या कोंडीतून हा बाजार मुक्त करण्यासाठी पर्याय जागेचा शोध ग्रामपंचायत प्रशासनाने घेऊन हा बाजार वाहतूक कोंडी मुक्त करावा अशी मागणी एक स्थानिक ग्रामस्थ म्हणून करीत आहे.”

 

-रोहित छगन झुंजारराव

नवलपाडा /सरळगाव


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *