नासिक महानगरपालिकेचा पशुसंवर्धन विभाग, नाकाखाली लुट करीत असतांना देखील आयुक्त साखर झोपेत आहेत का? भाजपा बुद्धिजीवी सेलचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष चंदन पवार यांचा सवाल
नासिक महानगरपालिकेचा पशुसंवर्धन विभाग, नाकाखाली लुट करीत असतांना देखील आयुक्त साखर झोपेत आहेत का?
भाजपा बुद्धिजीवी सेलचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष चंदन पवार यांचा सवाल

नाशिक प्रतिनिधी
नासिक महानगरपालिकेचा पशुसंवर्धन विभागाचा प्रताप दिवसेंदिवस वाढत आहे, त्यांनी एक श्वान निर्बिजीकरणासाठी एकाच शहरात दोन प्रकारचे दर लावले आहेत, जसे की उदाहरण म्हणून एक श्वान त्यांनी जर द्वारका परिसरातून निर्बिजीकरणासाठी पकडला तर त्याचा 995 रुपये दर आणि दुसरा श्वान नाशिकरोड किंवा गंगापूर रोड वरून पकडला तर हाच दर प्रति श्वानामागे 1356 रुपये इतका लावला जात आहे, हा पशुसंवर्धन विभागाचा दिवसाढवळ्या दरोडा नाशिक महानगरपालिकेवर किंबुहुना जनतेच्या तिजोरीवर पडत असतानांही पालिकेचे आयुक्त डॉ. अशोक करंजकर साखर झोपेत आहेत का असा सवाल भाजपा बुद्धिजीवी सेलचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष चंदन पवार यांनी विचारला आहे.
हा खर्च एकाच शहरात वेगवेगळा का याची माहिती पवार यांनी घेतली असता ट्रान्सपोर्टचे अंतर जास्त असल्यामुळे तसेच निर्बीजीकरण केंद्र दूर आहे अश्या प्रकारे खर्चात वाढ होते असा तथ्य नसलेला दावा केला गेला आहे, पालिकेचा पशुसंवर्धन विभाग अश्या प्रकारे दोन प्रकारचे दर देवून ठेकेदाराची पाठराखण करीत आहे तसेच पालिका अधिकाऱ्यानी आपली आणि ठेकेदाराची बँक जनतेच्या पैश्याने भरण्याची सरकारी योजना अमलात तर आणली नाही ना?? असा संतप्त सवाल देखील पवार यांनी पालिका आयुक्त अशोक करंजकर यांना विचारला आहे, तसेच एकाच शहरात दर वेगवेगळे असल्याने ही निविदा प्रक्रियाच संशयात आली आहे म्हणून पशुसंवर्धन विभागाचे मुख्य अधिकारी यांची खात्याअंतर्गत चौकशी करण्याची मागणीही पवार यांनी केली आहे



