वणीच्या आदर्श प्राथमिक शाळेत स्वर्गीय दिनकरराव थोरात यांची जयंती साजरी
वणीच्या आदर्श प्राथमिक शाळेत स्वर्गीय दिनकरराव थोरात यांची जयंती साजरी
सुरेश सुराशे /वणी
वणी गावचे सतरा वर्षे सरपंच पद भूषविलेले विकासपुरुष स्वर्गीय.कै दिनकरराव थोरात यांची जयंती आज मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे आदर्श प्राथमिक शाळा वणी येथे विविध मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर खासदार भास्कर भगरे, दिंडोरी विधानसभेचे माजी आमदार रामदास चारोस्कर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रशांत कड, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक श्री पोपटराव थोरात, डॉ योगेश गोसावी, सुनील थोरात, अनिल थोरात, माजी ग्रामपंचायत सदस्य मनोज थोरात, रवी कुमार सोनवणे, बंटी सैय्यद,,व इतर मान्यवर तसेच शाळेचे मुख्याध्यापक बदलते व त्यांच्या साहित्यात शाळेचे शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्व. दिनकरराव थोरात यांच्या राजकीय, सामाजिक जीवनाची माहिती दिली.स्व. दिनकरराव थोरात यांच्या सरपंच पदाचा कार्यकर्ते दूरदृष्टी कोण जेवण झालेला विकास यावर उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. आपल्या निर्भीड कार्यशैलीने स्व. दिनकरराव थोरात यांनी वणीकरांच्या मनात कायमचे अजरामर स्थान निर्माण केले असल्याचे मनोगत माजी आ.रामदास चारोस्कर यांनी व्यक्त केले.या वेळी विविध स्पर्धा परीक्षा व वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशाबद्दल सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्षीरसागर यांनी केले.