पित्याच्या वर्ष श्राद्धाला दीड लाखांच्या पुस्तकांचे वाटप; साहित्यिक पत्रकार संदीप वाकचौरे यांचा नवी वाट निर्माण करण्याचा उपक्रम स्तुत्य:डॉ. सोमनाथ मुटकुळे
पित्याच्या वर्ष श्राद्धाला दीड लाखांच्या पुस्तकांचे वाटप;
साहित्यिक पत्रकार संदीप वाकचौरे यांचा नवी वाट निर्माण करण्याचा उपक्रम स्तुत्य:डॉ. सोमनाथ मुटकुळे
संगमनेर-प्रतिनिधी
वडीलांच्या वर्षश्राध्दानिमित्त परंपराना फाटा देऊन उपस्थित प्रत्येकाच्या हाती पुस्तके देत,नवी वाट निर्माण करण्याचा प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद आहे.आपल्या समाजाला नव्या विचारांच्या वाटा शिक्षणातूनच सापडणार आहेत.महात्मा फुले यांनी सांगितलेला विचार,वर्तमानातही गरजेचा आहे.तो विचार वर्तमान काळाशी सुसंगत स्वरूपात समाजात पेरण्याचे काम संदीप वाकचौरे करत असल्याचे प्रतिपादन जेष्ठ नाटयलेखक,कलावंत डॉ.सोमनाथ मुटकुळे यांनी केले.ते वर्षश्राध्दानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
समाजात शहाणपणाची पेरणी करण्याची निंतात गरज आहे.आज समाज ज्या वेगाने ज्ञानक्षेत्रात गती घेतो आहे, तेवढयाच वेगाने समाजात अंधश्रध्दा देखील पसरल्या जात आहेत.आपल्या समाजात निर्माण झालेल्या पंरपरांचा विवेकी अर्थ जाणून घेण्याची गरज आहे.त्यादृष्टीने संदीप वाकचौरे यांनी वडीलांच्या वर्षश्राध्दाच्या निमित्ताने चपराक प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या “शिक्षणाचिये व्दारी ” या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.उपस्थित असलेल्या सर्वांनाच या पुस्तका सोबत शिक्षणाचे प्रश्नोपनिषद या पुस्तकाच्या प्रति भेट देण्यात आल्या.प्रत्येक पुस्तकाची किंमत तीनशे रूपये असून सुमारे पाचशे पुस्तकांचे वितरण करण्यात आले.दिड लाख रूपये किंमतीची पुस्तके भेट दिली आहेत.आपल्या समाजाला शहाणपणाच्या वाटेने घेऊन जायचे असेल तर अशा उपक्रमांची गरज आहे.आपण अनेक प्रसंगात केवळ वस्त्र देत असतो.आपण अशा वस्त्रांचा किती उपयोग करतो याचाही विचार करण्याची गरज आहे.त्याचा उपयोग न होता या पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षणाचा मूलभूत विचार पेरण्याचे काम घडेल.त्यामुळे वाकचौरे यांनी निर्मिलेल्या या वाटेचा प्रवास आपल्या बहुजन समाजाने करण्याची गरज आहे.पुस्तकांच्या माध्यमातून मस्तके घडत गेली तर समाजाचे उत्थान घडेल.त्यामुळे नव्या वाटा चालण्याचा प्रयत्न वाकचौरे यांनी केला असून त्या वाटांचे अनुकरण करणारी माणसं निर्माण करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.
संगमनेर येथील उद्योजक वाल्मिक चौधरी,शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाळासाहेब मुरादे,जेष्ठ संपादक गोरक्षनाथ मदने,प्रा.विठठलराव शेवाळे,ह.भ.प सुदाम महाराज कोकणे,वसंतराव वाकचौरे,प.स.माजी सदस्य नामदेव आंबरे,अभियंता नानासाहेब खर्डे,प्रा.श्री,भांगरे,प्रा.सावळेराम शिरसाठ,माजी तहसिलदार राजगुरू,कृषी उत्त्पन्न समितीचे माजी सभापती अनिल देशमुख,अशोकराव वलवे,बाळासाहेब दोरगे,शिक्षक नेते राजेंद्र सदगीर,सुखदेव मोहिते,श्रीकांत बिडवे,लेखक डॉ.संजय गोर्डे,माजी पोलिस उपनिरिक्षक उगले,देवीदास गोरे,अजय रावत,निवृत्ती कापडे,भास्कर कवडे.महेश सुर्यवंशी,विलास सुर्यवंशी,बाळासाहेब राऊत,प्रकाश पारखे आदींच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.कार्यक्रमास मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करणेसाठी सतीष वाकचौरे,विलास वाकचौरे,अक्षय वाकचौरे,प्रवीण रोकडे,ललित क्षिरसागर,राजेंद्र शिरसाठ, सतिष सोमवंशी सुनिता शिरसाठ,अर्चना शिरसाठ,अनिता चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डी.डी.वाकचौरे यांनी केले.आभार विनोद वाकचौरे यांनी केले.
नव्या वाटा चालण्याची गरज- चौधरी
“आपल्या समाजाने पैशाचा विनियोग अधिक चांगल्या मार्गाने करण्याची गरज आहे.आपण पंरपरा,रूढीच्या मार्गाने चालत असताना नव्या काळाशी नाते ठेवत त्यात योग्य ते बदल करत चालण्याची गरज आहे.केवळ रूढी आणि पंरपरांचा मार्ग चालण्याचा प्रयत्न केला तर त्यातून काहीच साध्य होणार नाही.मात्र सुख दुःखाच्या वाटेतही विवेकाची वाट चालण्याचा प्रयत्न केला तर समाजाची मस्तके घडवता येतील.त्यादृष्टीने संदीप वाकचौरे यांनी केलेला नवा प्रयोग निश्चित दखलपात्र ठरतो.आपल्या समाजाने समाजाची मने घडविण्यासाठी या नव्या वाटा चालण्याची गरज आहे.पुस्तकांच्या वाटांनी चालत गेलो तर मस्तके घडणे शक्य आहे.”– वाल्मिक चौधरी,उद्योजक,संगमनेर
https://youtu.be/EXAs0-1Rgrw