क्राईम

मराठा समाजाला हलक्यात घेऊन अंतरवली सराटीचे  आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न उलटेल :करण गायकर


मराठा समाजाला हलक्यात घेऊन अंतरवली सराटीचे  आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न उलटेल :करण गायकर

नाशिक प्रतिनिधी

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांनी देवेंद्र फडवणीसांसह राज्य सरकारवर आरोप करताना पहिल्यांदाच थेट हल्ला चढवला त्याचे कारण मागील 16-17 दिवस उपोषण करत असल्याने चिडचिड झाली असेल,शरीरातील सोडीयम कमी झाल्याने झाल्याने त्यांच्या तोंडून काही अपशब्द निघाले असतील त्यावर काल जाहीरपणे त्यांनी माफी देखील मागितली पण फडणवीसांवर थेट झालेल्या आरोपांमुळे त्यांची राजकीय कारकीर्द धोक्यात आली आहे देवेंद्र फडवणीस यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी ज्या पद्धतीने आपल्या पक्षातील सहकाऱ्यांना पुढे करून मराठा समाजावर जी चिखल फेक करण्याचा प्रयत्न केला आहे.हे तात्काळ थांबवावे.जरांगे पाटलांनी केलेल्या आरोपांमुळे काल प्रवीण दरेकर आशिष शेलार यांनी एसआयटी चौकशीची मागणी केली त्याला तात्काळ विधिमंडळात परवानगी देण्यासाठी जी काही धडपड करण्यात आली ती संविधानिक 50% च्या आत ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठ केली असती तर निश्चित सरकार व देवेंद्र फडवणीस यांचे मराठा समाजाने आभार व अभिनंदन केले असते.राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यावर मराठा समाजाचा विश्वास आहे आपण समाजाला न्याय द्याल ही आम्हाला अपेक्षा आहे.त्यामुळे ही दडपशाही न करता ज्या पद्धतीने मराठा समाजाचा राग मनात ठेवून मराठा योद्धा जरांगे पाटलांवर आरोप करण्यात आले त्यांना कुठेतरी अडचणीत आणण्याचा प्रयत्न करण्याचा चुकीचा जो प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून चालू आहे त्यांनी एवढ्याच लक्षात ठेवावे जरांगे पाटलांच्या पाठीशी मराठा समाज मोठ्या संख्येने आहे.याचा विसर राज्य सरकारने कधी पडू देऊ नये आता यानंतर जी काही खेळी राज्य सरकारकडून केली जाईल,त्यातली प्रत्येक खेळी त्यांच्यावर उलटणार आहे.हे निश्चित त्यामुळे आता त्यांनी कटकारस्थान करून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा सरकारने जरांगे पाटलांसोबत चर्चेची दार खुली ठेवली पाहिजे.त्यातून शांतपणे मार्ग काढला पाहिजे ही आमची सकल मराठा समाजाची मागणी आपल्याकडे आहे.

 

राज्य सरकार हे जनतेचं माय बाप असतं ते देण्याच्या भूमिकेत आहे यामुळे सरकारने आडमुठेपणा न करता समाजाने केलेल्या मागण्या त्यांनी समजून घेतल्या पाहिजे. आणि जे आताच करणं शक्य आहे त्यावर तात्काळ निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. सगेसोयरे अधिसूचनेबाबत नेमकी सरकारची काय भूमिका आहे, आंदोलनातील गुन्हे मागे घेणेबाबत काढलेल्या अध्यादेशांनंतर पुढची कारवाई नेमकी सरकारने काय केली आहे,मराठवाड्यात कुणबी दाखले देणेबाबत सरकारने हैद्राबाद संस्थानमधील निजामकालीन गॅझेट आणून त्यानुसार त्याची अंमलबजावणी करणे,ज्या गावातील,तालुका,जिल्हा,शहरातील कुणबी नोंदी सापडल्या असतील त्याची यादी जाहीर करणे तसेच कुणबी दाखले बाबाबत शिंदे समितीचे थांबवलेले काम राज्य करणारे पुन्हा सुरु करून त्यांना एक वर्षाची मुदतवाढ देणें सोबतच सदरचे काम समाजाच्या देखरेखी खाली व्हावे,पारदर्शक नोंदी शोधणे,सापडलेल्या बांधवांना दाखले आणि जात पडळताळणी देणें यासाठी शासनाच्या माध्यमातून एक दक्षता कमिटी नेमणे अशा सर्व बाबींची पूर्तता नेमकी कशा प्रकारे करता येईल याबाबत सरकारने स्पष्टपणे आपली भूमिका मांडणे गरजेचं आहे.

Advertisement

 

मनोज जरांगे पाटलांनी यापूर्वी देखील सरकारला मुबलक वेळ दिला आहे मागील सात महिन्यांपासून ते लढा देत आहेत,आंदोलन करत आहेत आणि प्रत्येकवेळी सरकारने त्यांच्याकडून वेळ मागून घेतली आहे आणि मनोज जरांगे पाटलांनी देखील सर्व गोष्टींचा विचार करून यापूर्वी देखील सरकारला वेळ दिला आहे पण आता नेमक काय झालं की सरकारने जरांगे पाटलांना,समाजाला दिलेले आश्वासन पाळले नाहीच उलट त्या मागणीला फाट्यावर मारून 50% बाहेरच आरक्षण देऊन मोकळे झाले,योद्धा जरांगे पाटील व मराठा समाजाचे आंदोलन सरकारने आता गांभीर्याने घेतलं नाही,सरकारने विशेष अधिवेशन तर बोलावलं पण सगेसोयरे अंमलबजावणी बाबत “ब्र” देखील काढला नाही यामुळे हे सरकार आपल्याला फसवतय ही भावना जरांगे पाटलांच्या आणि समाजाच्या मनात निर्माण झाली यामुळे सरकारने 10% आरक्षण देऊन ही समाजाने ते स्वीकारलं नाही कारण पुढचा धोका आता समाजाला ही माहित आहे.यामुळे सरकारने आता आंदोलन चिरडणे,दडपने अशी भूमिका न घेता दोन पावलं पुढे टाकून,पुढाकार घेऊन मनोज जरांगे पाटलांशी थेट चर्चेची दार खुली करावीत,चर्चेतून मार्ग नक्कीच निघू शकेल पण ही दडपशाही अशीच सुरु ठेवली तर येणाऱ्या काळात सरकारसाठी हे अडचणीचे ठरेलं हे निश्चित राज्य सरकारला आमचं एवढंच सांगणं आहे जरांगे पाटलांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी लावून आणि जरांगे पाटलांची नार्को टेस्ट करण्याची मागणी करून सरकारने स्वतःच्या हाताने पायावर धोंडा मारून घेतला आहे,यातून काही निष्पन्न होणार नाही.एस आय टी चौकशी लावायची असेल तर महाराष्ट्रातील ज्या ज्या लोकांनी मोठमोठे घोटाळे केलेले आहेत ज्या लोकांनी मोठमोठ्या संस्था काढून कारखाने काढून त्या माध्यमातून गडगंज संपत्ती जमवलेली आहे.त्या सर्व लोकांची एसआयटी चौकशी लावावी.भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादीमध्ये दुसऱ्या पक्षातून आलेले असंख्य आमदार खासदार यांसह ओबीसी महा एल्गार मेळाव्यांमध्ये ज्या नेत्यांनी मराठा समाजाचे हातपाय तोडू मराठा समाजाला अरबी समुद्रात बुडवू अशी बेताल वक्तव्य केले होते.यांसह मराठा समाजाच्या आंदोलनावर ज्या ज्या राजकीय लोकांनी चुकीचे आरोप प्रत्यारोप केले आहेत त्याही लोकांची एसआयटी चौकशी लावावी ही मागणी आम्ही आपल्याकडे करतो आहोत सरकारने तीही तातडीने पूर्ण करावी नाहीतर येणाऱ्या निवडणुकांमध्ये मराठा समाजाचा रोष आपल्याला परवडणारा नसेल.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *