पन्नास टक्केच्या वरिल आरक्षण ही मराठ्यांची फसवणूक:कुबेर जाधव
पन्नास टक्केच्या वरिल आरक्षण ही मराठ्यांची फसवणूक:कुबेर जाधव
नाशिक प्रतिनिधी
विशेष अधिवेशनात संमत झालेले स्वतंत्र मराठा आरक्षण विधेयकावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून आंदोलक मराठा समाजाने मात्र तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
सर्व राजकीय पक्षांनी मराठा समाजाला पन्नास टक्केच्या वरील आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याची भावना समाजातून व्यक्त केली जात आहे. मुळात मराठा समाजाने कायम पन्नास टक्केच्या आतील ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाची मागणी केलेली आहे,असे असताना महाराष्ट्र सरकारने २०१४ साली १६% आणि २०१८ साली १३% जाहीर केले होते, ESBC व SEBC अशी पन्नास टक्केच्या वरील आरक्षणे दिली होती, कालांतराने ती उच्च न्यायालयाने रद्द केली. आताही निवडणुकांच्या तोंडावर इतर राज्यांचा हवाला देत,मराठा समाजाला पन्नास टक्केच्या वरील आरक्षण देऊन सर्व राजकीय पक्ष हे मराठ्यांची फसवणूक करत आहेत. अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
“निवडणुकीच्या तोंडावर असंविधानिक आरक्षण द्यायच व निवडणुका झाल्या की आपल्याच बगलबच्चाकडुन त्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करायला लावायच्या, व ते रद्द करून घ्यायचे, हा डाव मराठा समाजाने पूर्णपणे ओळखलेला आहे परंतु आता मराठा समाज हा या डावपेचात अडकणार नाही. मराठा समाजातील जे कोणी अभ्यासक, समन्वयकनेते,कार्यकर्ते, या पन्नास टक्क्यावरील आरक्षणाला पाठिंबा देतील ते सर्व पक्षाचे,नेत्यांचे दलाल व समाजाचे गद्दार ठरतील, पन्नास टक्केच्या आतील आरक्षण व ‘सगे सोयरे’ या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी याकरिता येणाऱ्या काळात मराठा समाजाचा मोठा संघर्ष उभा करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील गोरगरीब मराठा समाज रस्त्यावर उभा राहील.”
-कुबेर जाधव समन्वयक स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक
अंतरवली सराटीला महत्त्वाची बैठक:
उद्या अंतरवाली सराटी येथे महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे
या बैठकीत
आजच्या विशेष अधिवेशनात सरकारने *सगेसोयरे* कायद्याबद्दल कोणताही निर्णय घेतला नाही.
याबद्दल समाजासोबत विचार मंथन करून, आंदोलनाचा पुढील निर्णय जाहीर करण्यासाठी, *मनोज जरांगे पाटील पाटील यांनी बुधवार दिनांक २१ रोजी दुपारी १२ वाजता,महत्त्वाची बैठक बोलावली आहे.राज्यातील सर्व उपोषणकर्ते, वकील, अभ्यासक व मराठा सेवकांनी बैठकीस यावे.असे आव्हाहन करण्यात आले आहे.