वसंत गितेंच्या मोटारसायकल रॅलीमुळे मध्य नाशिक दुमदुमले; विक्रमी विजयासाठी नाशिककरांनी दिल्या शुभेच्छा; नाशिकच्या भविष्यासाठी प्रचार रॅलीत युवकांचा उत्स्फूर्त सहभाग
वसंत गितेंच्या मोटारसायकल रॅलीमुळे मध्य नाशिक दुमदुमले;
विक्रमी विजयासाठी नाशिककरांनी दिल्या शुभेच्छा;
नाशिकच्या भविष्यासाठी प्रचार रॅलीत युवकांचा उत्स्फूर्त सहभाग
“भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म दिवस म्हणजे आजची जयंती मध्य नाशिकचे नागरिक विसरणार नाहीत. भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी सारे ऐश्वर्य पणाला लावणाऱ्या पंडितजींच्या जयंती दिनी मध्य नाशिकच्या मतदा्रांनीही ड्रग्ज, गुन्हेगारी, भ्रष्टाचारापासून नाशिक शहराला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा निर्धार केलाय.. निमित्त होते, महाविकास आघाडीचे विधानसभा उमेदवार बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक वसंत गीते यांच्यासाठी मध्य नाशिककरांनी उत्स्फूर्तपणे काढलेली मोटार सायकल रॅलीचे….”
नाशिक – (प्रतिनिधी)
मध्य नाशिक विधानसभा मतदार संघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गिते यांच्या प्रचारार्थ शहरातील प्रमुख मार्गाने मोटारसायकल रॅली काढण्यात आली. याप्रसंगी रॅली मार्गावर नाशिककरांनी फुलांची उधळण…फटाक्यांची आतषबाजी तसेच महिला वर्गाने औक्षण करत श्री. गिते यांना विक्रमी विजयासाठी शुभेच्छा दिल्या. नाशिक शहर वाचवण्यासाठी ‘भयमुक्त, ड्रग्जमुक्त गुन्हेगारी मुक्त नाशिक’ या मोहिमेला बळ देण्याचा निर्धार नाशिककरांनी व्यक्त केला असुन विकसित नाशिक करण्यासाठी युवकांनी मोठ्याप्रमाणात रॅलीत सहभाग नोंदवला.
शिवसेनेच्या शालीमार चौकातील मुख्य प्रचार कार्यालयापासून मोटारसायकल रॅलीस प्रारंभ झाला. याप्रसंगी खासदार राजाभाऊ वाजे, शिवसेना प्रदेश संघटक तथा माजी महापौर विनायक पांडे, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस तथा माजी आमदार नितीन भोसले, महानगरप्रमुख विलास शिंदे, मध्य नाशिक विधानसभा प्रमुख बाळासाहेब कोकणे, उपजिल्हाप्रमुख सचीन मराठे, माजी उपमहापौर प्रथमेश गिते, उपशहर प्रमुख शाम कंगले, ऋतुराज पांडे, संजय चव्हाण, सिराज जीन, सुभाष नहार, ऋषी वर्मा, भैय्या मणियार, सुभाष शेजवळ, विनायक खैरे, वैभव खैरे, बाळासाहेब पाठक, संपतराव जाधव, संजय परदेशी, रंगरेज दस्तगीर, करण लोणारी, संदेश फुले, सचिन बांडे, राजेंद्र क्षिरसागर, गोविंद कांकरिया, रवी जाधव, राजू राठोड, विलास घोलप, गोरख वाघ, विनोद नुंनसे, बाळासाहेब आहेरराव, वामनराव तमखाने, बंडु चाटोरीकर, संतोष कहार, मिलिंद जाधव, विभाग प्रमुख गणेश परदेशी, अँड. पंकज जाधव, युवती सेना जिल्हा अधिकारी शिल्पा चव्हाण, किर्ती निरगुडे, फैमिदा रंगरेज, शहर अधिकारी साक्षी विधाते, तनुश्री कदम यांच्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), काँग्रेस तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेना कार्यालय, नेहरू उद्यान, यशवंत व्यायाम शाळा, मेहेर सिग्नल, अशोक स्तंभ, रविवार कारंजा, मेनरोड, धुमाळ पॉईंट, नेहरू चौक, सोमवार पेठ, साक्षी गणेश, बादशाही कॉर्नर, दूध बाजार, वाकडी बारव, चौक मंडई, काजीपुरा, बुधवार पेठ, छपरीची तालीम, शहीद शिरीषकुमार चौक, शितळा देवी, नानावली, ट्रॅक्टर हाऊस, टाकळी रोड, सावता माळी उद्यान, बनकर चौक, काठे गल्ली, भाभानगर मार्गे मुंबई नाका येथे
रॅलीचा समारोप झाला. रॅलीत शेकडो युवक-युवती सहभागी झाले होते.
—————————————————-
बॉक्स :-
मत फंसो चक्कर में….कोई नही है टक्कर में !
मध्य विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गिते प्रारंभापासूनच आघाडीवर आहेत. गुरुवारी निघालेल्या मोटारसायकल रॅलीमुळे शहरातील वातावरण
भगव्या टोप्या, भगवे झेंडे व उत्साही शिवसैनिक यामुळे शिवसेनामय झाले होते. रॅली मार्गावर ठिकठिकाणी वसंत गिते यांचे महिलांनी औक्षण केले. रविवार पेठेत व्यापाऱ्यांनी श्री. गिते यांना शुभेच्छा दिल्या.
चौकाचौकात होणारी फटाक्यांची आतषबाजी, शिवसैनिकांच्या घोषणा यामुळे उत्साहाला उधाण आले होते. ‘मत फंसो चक्कर में, कोई नही है टक्कर में’….नाशिकका आमदार कैसा हो, वसंत गिते जैसा हो….कोण म्हणतो येत नाही, आल्याशिवाय रहात नाही, वसंत भाऊ आगे बढो, सब तुम्हारे साथ है यासारख्या घोषणांनी मध्य नाशिक दुमदुमले होते. विविध ठिकाणी ज्येष्ठ नागरिक तसेच व्यापाऱ्यांनी वसंत गिते यांना विजयी भवः असा आशिर्वादही दिला.
-भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म दिवस म्हणजे आजची जयंती मध्य नाशिकचे नागरिक विसरणार नाहीत. भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी सारे ऐश्वर्य पणाला लावणाऱ्या पंडितजींच्या जयंती दिनी मध्य नाशिकच्या मतदा्रांनीही ड्रग्ज, गुन्हेगारी, भ्रष्टाचारापासून नाशिक शहराला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा निर्धार केलाय.. निमित्त होते, महाविकास आघाडीचे विधानसभा उमेदवार बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक वसंत गीते यांच्यासाठी मध्य नाशिककरांनी उत्स्फूर्तपणे काढलेली मोटार सायकल रॅलीचे….