महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला… भाजप कार्यकर्त्यांनी भावाची गाडी फोडल्याने शहरात तणाव.. खा. सुप्रिया सुळे यांनी घेतली पोलिस आयुक्तांची भेट… उमटू लागल्या संतप्त प्रतिक्रिया…
महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला…
भाजप कार्यकर्त्यांनी भावाची गाडी फोडल्याने शहरात तणाव..
खा. सुप्रिया सुळे यांनी घेतली पोलिस आयुक्तांची भेट…
उमटू लागल्या संतप्त प्रतिक्रिया…
नाशिक प्रतिनिधी
मतदानाची तारीख जशी जवळ येऊ लागली तसे तसे नाशिक पुर्व विधानसभा मतदार संघात राजकीय तणाव वाढत असल्याचे जाणवते. त्याच तणावातून आज त्रिकोणी गार्डन परिसरात महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचे वृत्त समोर आलंय. त्रिकोणी गार्डन परिसरात गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते आपल्या कार्यकर्त्यांसमवेत प्रचार करीत असताना दुपारी बारा वाजेच्या सुमारास प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार राहुल ढिकले यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातला. त्यावेळी शाब्दिक चकमक होऊन वातावरण तणावपूर्ण बनले. वाद टाळण्यासाठी गोकुळ गीते यांनी आपली गाडी घटनास्थळावरून हलवली. आणि थेट पोलिस आयुक्तालय गाठले. ही वार्ता शहरभर पसरताच महाविकास आघाडीचे शहरातील सर्व प्रमुख नेत्यांनी कार्यकर्त्यांसह पोलिस आयुक्तालय गाठले.
पराभव समोर दिसत असल्यामुळेच असे हल्ले करण्याचे षडयंत्र सुरु झाल्याचा आरोप यावेळी गणेश गीते यांच्या सह आघाडीच्या नेत्यांनी केला. दरम्यान जाहीर सभेसाठी नाशिकमध्ये आलेल्या खा. सुप्रिया सुळे यांनीही पोलिस आयुक्तांची भेट घेऊन निषेध नोंदवत गुन्हेगारांवार कारवाईची मागणी केली.
या हल्ल्यात सराईत गुन्हेगार सहभागी असल्याचा आरोप आघाडीच्या नेत्यांनी केलाय. अनेक गंभीर गुन्हे दाखल असतानाही त्यांच्या कार्यकर्त्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात नसल्याने नाराजी व्यक्त करून पोलिसांनी निष्पक्ष रहावे अशी अपेक्षा गणेश गीते यांनी व्यक्त केलीये.