क्राईम

ठाणगाव गटातील गोधरी शिंदे वस्ती रस्त्याचे काम निकृष्ट ; निविदेतील अटी शर्तीचे उल्लंघन ; दक्षता गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या तपासणीनंतरच देयके अदा करण्याची मागणी 


ठाणगाव गटातील गोधरी शिंदे वस्ती रस्त्याचे काम निकृष्ट ; निविदेतील अटी शर्तीचे उल्लंघन ;

दक्षता गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या तपासणीनंतरच देयके अदा करण्याची मागणी 

Advertisement
सिन्नर प्रतिनिधी
सिन्नर तालुक्यातील  ठाणगांव गटातील गोधरी ते रामदास शिंदे यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून निवेदीतील अटी शर्तीचे पालन देखील झाले नसल्याने   कामाची दक्षता आणि गुणवत्ता नियंत्रण विभाग यांच्याकडून तपासणी करूनच  देयक अदा करावे, अशी मागणी भाजप भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष  मुकुंद काकड यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना केली आहे.
या संदर्भात मुकुंद काकड यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात  म्हटले आहे की,सिन्नर तालुक्यातील  ठाणगांव गटातील गोधरी ते  रामदास शिंदे यांच्या घराकडे जाणाऱ्या  रस्त्याच्या कामासाठी कार्यदेश देण्यात आले होते. सदरचे काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे, निविदाच्या अटी व शर्तीचे पालन न  करता पूर्ण केले आहे. सदर कामाच्या “प्रपत्र-ब मध्ये M-2 काँक्रीटची तरतूद केलेली आहे. परंतु प्रत्यक्षात काम करते वेळी कंत्राटदराने  वरच्या वर खोदकाम करून व फक्त ठीक ठिकाणी सोलिंग  करून ५०% सिमेंटचा वापरून करून M-10 काँक्रेट पेक्षा कमी ग्रेडच्या  काँक्रिटचा वापर केला आहे. त्या  निविदामध्ये दिलेली काँक्रीट  थीकनेस फक्त रस्त्याच्या दोन्ही बाजूने  दर्शवून रस्त्याच्या मधोमध फक्त ३ ते ४ इंच दाखवलेली आहे. त्यामुळे सदरचे काम फक्त दोन महिन्याच्या आत खराब होऊन ठीक ठिकाणी तडे गेले आहेत. ठीक ठिकाणी गहे पडलेले आहे, असे असताना  सुद्धा झालेल्या कामामध्ये व उप अभियंता/शाखा अभियंता यांनी कामाची कुठलीही पाहणी न करता मोजमाप पुस्तकामध्ये नोंदी घेतलेल्या आहेत. त्यामुळे सदरच्या नोंदीमध्ये ३०-४०% इतकी तफावत असल्याचा अंदाज नाकारू शकत नाही.
त्यामुळे सदरचे काम निकृष्ट दर्जाचे  व निविदा अटी व शर्तीचे पालन न करता करण्यात आलेले आहे. त्यामुळे सदर कामाची गुणवत्ता नियंत्रण विभाग यांच्याकडून तपासणी करून त्यांचा अहवाल प्राप्त झाल्या नंतरच देयक अदा करावे. तसेच नकारात्मक अहवाल प्राप्त झाल्यास सदर कंपनीस काम हे निकृष्ट दज्यांचे व निविदाच्या अटी व शर्तीचे पालन न केल्याप्रकरणी काळ्या यादीत टाकण्यात यावे. अशी मागणी काकड या पत्रातून केली आहे.या पत्राची प्रत कार्यकारी अभियंता, तसेच इ व द उपविभाग सिन्नर, यांनाही पाठविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *