संत कबीरांचा राम, मंदिरात सापडत नाही ; जाखोरी येथे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
संत कबीरांचा राम, मंदिरात सापडत नाही ;
जाखोरी येथे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️
मराठी संस्कृती जतन करा
……………………………
जाखोरी प्रतिनिधी
जाखोरी (ता. जि. नाशिक) येथील विचारक्रांती सार्वजनिक वाचनालय आणि अभ्यासिकेतर्फे दिनांक ५ जानेवारी २०२५ रोजी ‘विचारक्रांती युवा वक्ता २०२५’ या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
वक्तृत्व स्पर्धेचे यंदाचे 8वे वर्षे आहे.
वक्तृत्व स्पर्धेसाठी विषय:
🔸भारतीय तरुण आणि स्टार्टअप: स्वप्नं, संधी आणि आव्हाने
🔸आता काय बदलायच बाकी आहे…?
🔸जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, विचारांची कळ – संत तुकाराम महाराज
🔸’आपली’ संस्कृती जपतांना..
🔸… ही दुनिया अडीच अक्षरांची.. !
🔸दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा..
🔸सहकार चळवळीचे ऐतिहासिक महत्त्व आणि भविष्यातील दिशा
Advertisement🔸संत कबीरांचा राम मंदिरात सापडत नाही.
स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांकासाठी सात हजार रुपये, दुसऱ्या क्रमांकासाठी पाच हजार रुपये, तिसऱ्या क्रमांकासाठी तीन हजार रुपये, चौथ्या क्रमांकासाठी दोन हजार रुपये आणि सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविले जाणार आहे. तसेच ह्यावर्षीपासून वाचनालयातर्फे प्रथमच सांघिक पारितोषिक ठेवण्यात आले आहे. कायमस्वरूपी करंडक व रोख 3000 रूपये असे ह्या सांघिक पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. याशिवाय पाच उत्तेजनार्थ क्रमांकासाठी प्रत्येकी एक हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.
महाराष्ट्राच्या विचारमंचावर आपली छाप उमटविण्याची संधी हया राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेद्वारे तरूणांना दिली जात असून, त्यासाठी जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष सुहास खाडे, देविदास राजपूत, कृषि उद्योजक विश्वास कळमकर, राहुल धात्रक, आदींनी केले आहे.
स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी 84118 16162/7021099067 हया क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.