नाशिककरांना आवाहन, नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी,चलो राजीव गांधी भवन; नाशिक शहरात जोरात आहे जमीन घोटाळा ! वृक्ष घोटाळा अवकाळीचा खोडाळा ! अवकाळीचा मोखाडा
नाशिककरांना आवाहन, नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी,चलो राजीव गांधी भवन;
नाशिक शहरात जोरात आहे
जमीन घोटाळा ! वृक्ष घोटाळा
अवकाळीचा खोडाळा !
अवकाळीचा मोखाडा
☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️
मराठी संस्कृती जतन करा
………………………………………………………………
नाशिक प्रतिनिधी
नाशिक शहरात जोरात आहे
जमीन घोटाळा ! वृक्ष घोटाळा
शेतकरी राजासाठी मात्र
अवकाळीचा खोडाळा ! अवकाळीचा मोखाडा
नाशिक प्रतिनिधी
दस्तुरखुद्द आयुक्तांच्या घरीच दिवसाढवळ्या झालेल्या अवैध वृक्षतोडीबाबत उद्यान अधीक्षक अनभीज्ञ असतांना शहरातील वाढती वृक्षतोड नाशिकचे आल्हाददायक वातावरण बिघडविण्यास कारणीभूत ठरणार आहे. वृक्षलागवड व वृक्षसंगोपनाबाबतच्या कायद्यांची पालिकेच्या व नागरिकांच्या जबाबदारीची माहिती,जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचवून झाड त्रास नसून, श्वास आहे हि जाणीव करवून देत सुज्ञ नागरिकांनी वृक्षसंवर्धना बाबत पालिकेला व जबाबदार अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचे आवाहन नाशिक पर्यावरण प्रेमी संघटनांकडून करण्यात येत आहे. नवीन वर्षाची सुरवात वृक्षसंगोपनाने करत पालिकेकडून कागदावर लावण्यात आलेल्या तब्बल 70000 झाडांची अधिकाऱ्यांनी वृक्षप्रेमी संघटनांबरोबर पाहणी करण्याची मागणी नूतन आयुक्तांना भेटून करण्यासाठी बुधवार दि. 1 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता राजीव गांधी भवन येथे जास्तीत जास्त नागरिकांनी एकत्रीत येण्याचे आवाहन वृक्षप्रेमी संघटनांद्वारे करण्यात येत आहे
कॉंक्रिटच्या जंगलात तापमान वाढ, वातावरणीय बदल गंभीर समस्या ठरत आहे. विकासाचा शोध विनाशाकडे घेवून जाणारा नसावा, यासाठी वृक्षसंगोपना शिवाय आता पर्याय नाही. शहरातील वृक्षसंगोपनाची जबाबदारी पाकिकेच्या उद्यान विभागाची. मोकळे भूखंड,रहिवाशी क्षेत्र,नदी किनारा,रस्त्याच्या कडेला रस्त्याच्या रुंदीनुसार किमान 10 ते 20 मी.अंतरावर वृक्षलागवडीचा शासकीय अध्यादेश असतांना फक्त वृक्षलागवड व वृक्ष संवर्धनासाठी दरवर्षी तब्बल 10 ते 16 कोटी रुपयांचा नाशिक पालिकेचा वृक्षनिधी-वृक्षबजेट. जैवविविधता जोपासणे व अन्नसाखळी अबाधीत राखण्यासाठी विविध स्थानीक भारतीय वृक्षप्रजातींचीच लागवड करण्याबाबात राज्य सरकार व केंद्र सरकारही आग्रही असतांना नाशिक शहरातील वृक्षप्रेमी संघटनांनी विविध भारतीय वृक्ष प्रजातींच्या यादीसह वृक्षलागवडीच्या शासकीय अध्यादेशाचे पालन करण्यासाठी पालिकेने वृक्षनिधीचे नियोजन करून वृक्षसंवर्धन करण्याबाबतची पालिकेला अनेकदा विनंती केलेली आहे. मध्यंतरी उद्यान विभागाने तब्बल 70000 वृक्षांचे ब्लॉग प्लांटेशन केल्याची माहिती वृत्तपत्रात प्रकाशीत झाली. उद्यान अधीक्षकांकडूनच याबाबतची खातरजमा केल्यावर पर्यावरण प्रेमींनी या 70000 वृक्षांची संयुक्त पाहणी करण्यासाठी उद्यान विभागाकडे पाठपुरावा केला असता, लागवड करण्यात आलेल्या वृक्षांबाबत माहिती अधिकारात माहिती देण्यासही उद्यान विभागाकडून आता टाळाटाळ केली जात आहे. करोडो रुपये खर्च करून फक्त कागदावरच वृक्षलागवड केली जात असेल तर हरित नाशिकची संकल्पना ही फक्त कागदावरच राहण्याची भीती पर्यावरण प्रेमींनी माध्यम प्रतिनिधींशी बोलतांना व्यक्त केली. उच्च न्यायालयाचा आदेश डावलून शहरात पालिकेकडूनच केली जात असलेली अवैध वृक्षतोड चर्चेचा विषय ठरत असतांना वृक्षसंगोपनाबाबत पालिकेची उदासीनता लाखो रुपये खर्चाच्या पुष्पमहोत्सवासाठी दरवर्षी कशी प्रफुल्लीत होत असावी, हा मात्र नागरिकांसाठी मोठ्या कुतूहलाचा विषय ठरत आहे. वृक्षांभोवती मोठे रिफ्लेक्टर्स ,झाडांभोवती वाहतूक बेट,मोठ्या झाडांजवळ योग्य ठिकाणी गतिरोधक या सारख्या उच्च न्यायालयाने सुचविलेल्या उपाययोजना करून झाडांमुळे होणारे अपघात टाळता येणे पालिकेला सहज शक्य असतांना याबाबतही उदासीन पालिका.. रस्त्याकिनारी वर्षानुवर्षे उभे राहून वाटसरू,कष्टकऱ्यांना सावली देणाऱ्या वृक्षसंपदेलाच अपघातास दोषी ठरवून झाडांबाबत अपप्रचार करीत, रस्त्याकिनारी उभ्या वृक्षांबाबत जनतेत संभ्रम निर्माण करीत असतांना नुकतेच उच्च न्यायालयाने नाशिक वृक्षसंपदेच्या रक्षणाचा आपला निकाल कायम ठेवत,जुन्या व मोठ्या वृक्षांची तोड न करता न्यायालयाने सुचविलेल्या उपाययोजना करून वाहतुकीचे व्यवस्थापन करण्याचे,नागरिकांच्या व वृक्षसंपदेच्या रक्षणाचे आदेश पालिकेला दिले आहेत. वृक्षसंपदेचा मागमूस नसणाऱ्या समृद्धी महामार्गासारख्या अत्याधुनिक रस्त्यांवर होणारे प्रचंड अपघात लक्षात घेता रस्त्याकिनारी असलेली वृक्षसंपदा नियंत्रित वाहतुकीसाठी नैसर्गिक गतिरोधक बनून रस्यांना प्राणवायुचाही पुरवठा करीत असतांना ठेकेदारांच्या हितासाठी,सरळ सुलभ वाहतुकीसाठी वृक्षतोड अश्या अजब गजब सल्लागारांसाठी,न्यायालयाचाही हेतुपुरसर अवमान करत उद्यान अधीक्षकांनी वृक्षतोड हेच उद्दिष्ट ठेवून नाशिकला भकास,उदास करण्याचा जणू वीडाच उचललेला आहे.असा स्पष्ट आरोपच पर्यावरण प्रेमीं करत असून अवैध वृक्षतोड व वृक्ष घोटाळ्यास कारणीभूत दोषी उद्यान अधीक्षकांच्याही बदलीची मागणी आता जोर धरत आहे. उंडी,बहावा,बकुळ,काटेसावर,चाफा,ताम्हण,सीता अशोक,ताड,माड यासारख्या पशुपक्षांसाठी उपयुक्त असंख्य शोभिवंत भारतीय वृक्षप्रजातींचा खजीना असलेल्या देशात दुभाजकात टर्मिनिलिया मादागास्कर सारख्या पर्यावरण विघातक आक्रमक विदेशी वृक्षप्रजातीची पालिकेकडून सर्रास लागवड केली जाण्यावर पर्यावरण प्रेमींनी अनेकदा आक्षेप घेवून आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे. नुकतीच दस्तुरखुद्द आयुक्तांच्या घरीच दिवसाढवळ्या झालेल्या अवैध वृक्षतोडीबाबत उद्यान अधीक्षक अनभीज्ञ असतांना शहरातील वाढती वृक्षतोड नाशिकचे आल्हाददायक वातावरण बिघडविण्यास कारणीभूत ठरणार आहे. वृक्षलागवड व वृक्षसंगोपनाबाबतच्या कायद्यांची पालिकेच्या व नागरिकांच्या जबाबदारीची माहिती,जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचवून झाड त्रास नसून, श्वास आहे हि जाणीव करवून देत सुज्ञ नागरिकांनी वृक्षसंवर्धना बाबत पालिकेला व जबाबदार अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचे आवाहन नाशिक पर्यावरण प्रेमी संघटनांकडून करण्यात येत आहे. नवीन वर्षाची सुरवात वृक्षसंगोपनाने करत पालिकेकडून कागदावर लावण्यात आलेल्या तब्बल 70000 झाडांची अधिकाऱ्यांनी वृक्षप्रेमी संघटनांबरोबर पाहणी करण्याची मागणी नूतन आयुक्तांना भेटून करण्यासाठी बुधवार दि. 1 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता राजीव गांधी भवन येथे जास्तीत जास्त नागरिकांनी एकत्रीत येण्याचे आवाहन वृक्षप्रेमी संघटनांद्वारे करण्यात येत आहे.