क्राईम

चांदवड तहसीलदार मंदार कुलकर्णी यांचे शिव पाणंद शेत रस्ते खुले करण्याचे आशासन; तहसिलदारांचा सन्मान करत ऐतिहासिक निर्णयाचे शेतकऱ्यांकडून स्वागत


चांदवड तहसीलदार मंदार कुलकर्णी यांचे शिव पाणंद शेत रस्ते खुले करण्याचे आशासन;

तहसिलदारांचा सन्मान करत ऐतिहासिक निर्णयाचे शेतकऱ्यांकडून स्वागत

☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️

       मराठी संस्कृती  जतन करा 

……………………………………………………………………………

चांदवड प्रतिनिधी

पिढ्यान पिढ्या शेतकऱ्यांचा शेतरस्त्यासाठी चाललेला संघर्ष थांबावा यासाठी महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे, राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांच्या वतीने चळवळीच्या माध्यमातून राज्यभर सुरू केलेल्या आंदोलनाला राज्यभर मोठा शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळत असून जिल्हा तहशील कार्यालयात शेतरस्त्या संबंधात गांभीर्य निर्माण करत खेडोपाडी गावोगावचे शेतकरी चळवळीत सहभागी होत असून या आंदोलनाला न्यायालयीन प्राप्त झाल्यानंतर प्रशासकीय कार्यालयाकडून शेतकऱ्यांची शेतरस्त्यांसाठी होणारी हेळसांड थांबवण्यासाठी विविध सामाजिक संघटनाअन्नदात्याच्या पाठीशी उभे राहत आहे त्यातच चांदवड तालुक्यातील शासकीय विश्रामगृहावर शेतकऱ्यांच्या नियोजित बैठकीत राजव्यापी आंदोलनाचे निर्णय घेण्यात आले यावेळी चांदवड शिव पानंद शेतरस्ता कृती समितीची स्थापना करण्यात आली त्यानंतर चांदवड तहसील कार्यालय येथे शेतकऱ्यांनी अतिशय गांधीगिरी मार्गाने प्रशासनाला शेतरस्त्या संबंधित विविध मागण्यांचे निवेदन दिले यावेळी तहसीलदारांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांना गांभीर्याने घेत शासन निर्णयाच्या अंमलबजावणी करत विशेष परिपत्रक काढत गावोगावी ग्राम शेतरस्ता समित्या स्थापन करण्याचे निर्देश ग्रामपंचायतींना देत शासन निर्णयाच्या अंमलबजावणी करण्यासंदर्भात सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या त्याचबरोबर दर पंधरा दिवसाला शेतरस्त्यांठी जनअदालत दिन सुरू करण्याचे आश्वासन दिले यावेळी शेतकऱ्यांनी तहसीलदारांनी शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर राखत शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी तहसीलदारांच्या दालनात तहसीलदारांचा सत्कार करून सन्मान करत त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेत रस्ता चळवळीचे नेते उपस्थित होते तालुकास्तरीय कृती समिती निवेदनात सहभागी झाली.संपूर्ण चांदवड तालुका शिव पानंद शेत रस्ते चळवळीचे शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. कृती समितीचे जनक गणपत पानसरे, ज्ञानेश्वर रंगनाथ शिंदे, शंकर श्रावण जाधव, समाधान राजाराम आहेर, उमेश सूर्यवंशी सर, नितीन बाबुराव पानसरे, राहुल भास्कर जाधव, सुरज सोपान जाधव, कैलास जाधव, जगदीश जोशी, राजेंद्र वाल्मीक केकान, गणपत मुरलीधर जाधव, पंडितराव मोकाट, गणपत रामचंद्र गवळी,आदी शेतकरी उपस्थित होते…

Advertisement

“महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने जनजागृती जनआंदोलन न्यायालयीन लढयाला बळ देणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतरस्त्यांच्या व्यथा समजून घेत प्रशासकीय पदाला योग्य न्याय देणाऱ्या चांदवड तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी काढलेले परिपत्रक शेतकऱ्यांच मन जिंकणारे आसून शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणीत झाला.इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यांचा आदर्श घ्यावा”.

– शरद पवळे दादासाहेब जंगले पाटील

महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळ


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *