अवैध धंदे रोखण्यात पोलिस अपयशी पोलिस अधीक्षक ओला यांची खंत; प्रभारी अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा
अवैध धंदे रोखण्यात पोलिस अपयशी
पोलिस अधीक्षक ओला यांची खंत; प्रभारी अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा
☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️
मराठी संस्कृती जतन करा
……………………………………………………………………………..
अहिल्यानगर प्रतिनिधी
नगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांना तत्काळ आवर घाला. सध्या पोलिस दलाकडून सुरू असलेले कामकाज समाधानकार नसल्याने पोलिस दलाची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व पोलिस उपअधीक्षकांनी अवैध धंदे रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात. आदेश देऊनही कारवाई न झाल्यास संबंधित ठाणे प्रभारी व उपविभागीय अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी दिला आहे. राज्यातील दहा ते पंधरा दिवसांतील घटना पाहता पोलिस दल अॅक्शन मोडवर आले आहे.
पोलिस महासंचालक व नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांनी पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करावे, असा आदेश धाडला आहे. त्यानुसार पोलिस अधीक्षक ओला यांनी प्रभारी अधिकाऱ्यांना आदेश काढले आहेत. जिल्ह्यातील अवैध दारू विक्री, जुगार, मटका, लॉटरी, व्हिडीओ पार्लर, अवैध गुटखा, अवैध शख, हुक्का पार्लर, मसाज पार्लर, अंमलीपदार्थ, डान्सबार, अवैध प्रवासी वाहतूक, अवैध वाळू वाहतूक आदी अवैध धंद्यावर वेळीच कारवाई करा. सर्वच पोलिस ठाण्याच्या हद्दीत राजरोजपणे अवैध धंदे सुरू आहेत. ही बाब गंभीर दखल घेण्याजोगी आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी कारवाई करून अवैध धंदे बंद झाले नाहीत. त्याचे समुळ उच्चाटन झाल्याचे दिसून येत नाही. दिवसेंदिवस नागरिकांच्या तक्रारी वाढल्या असून, पोलिस दलाची प्रतिमा मलिन होत असल्याचे अधीक्षक ओला यांनी म्हटले आहे. त्यामुळे पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांवर तत्काळ कारवाई करा. अवैध धंद्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही. विविध मागनि अवैध धंद्यावाल्यांना मदत करणाऱ्यांवरही कारवाई करावी. कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी शासनाच्या अन्य विभागाची मदत घ्यावी, अशी सूचना प्रभारी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहे
परजिल्ह्यातील पथक धाड टाकणार?
एखाद्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत राजरोसपणे अवैध धंदे सुरू राहिल्यास आणि संबंधित प्रभारी अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाणार आहे. संबंधित पोलिस ठाण्याच्या हद्दीत शेजारील जिल्ह्यातील पथक छापे घालून अवैध धंदे उद्ध्वस्त करणार आहे. ही कारवाई यशस्वी झाल्यास संबंधित अप्पर पोलिस अधीक्षक, पोलिस उपअधीक्षक, पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेला जबाबदार धरण्यात येईल, असेही अधीक्षक ओला यांनी स्पष्ट केले आहे.
शिस्तभंगाची कारवाई करणार
पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे आढळून आल्यास संबंधित ठाणे प्रमुखाला कर्तव्य कसूर केल्याचा ठपका ठेवत नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. तसेच, संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरण्यात येऊन त्यांचा अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात येणार आहे, असा इशाराही ओला यांनी दिला आहे.