क्राईम

भारताचे स्मित हास्य हरपले!


भारताचे स्मित हास्य हरपले!

 

 

 

भारतीय अर्थव्यवस्थेच्या पाया रचणारे, जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे दुःखद निधन झाल्याचे वृत्त आहे.

डॉ. मनमोहन सिंह यांच्या २००४-१४ या कार्यकाळात भारत जगातील ३ री मोठी अर्थव्यवस्था बनला होता. डॉ. मनमोहन सिंह यांच्या आर्थिक धोरणांनी भारताला जागतिक मंदीपासून दूर ठेवले होते. संपूर्ण जगाचा जीडीपी कोसळत असताना भारताचा जीडीपी दर सर्वोच्च ठेवण्यात त्यांनी यश मिळवले होते. आज वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांचे ९.५१ वा.निधन झाल्याचे वृत्त आहे. तथापी रात्री उशिरा पर्यंत एम्स प्रशासनाने या वृत्ताला दुजोरा दिला नव्हता. त्यांच्या फुफ्फुसात इन्फेक्शन झाल्याने एम्समध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांची प्रकृती नाजूक झाल्याने त्यांना आयसीयुमध्ये हलविण्यात आले, एव्हढीच माहिती रुग्णालय प्रशासनाकडून प्राप्त झाली. दरम्यान हे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच अवघा देश दुखसागरात बुडाला असून सर्व प्रमुख राजकीय नेत्यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करून राजधानीकडे धाव घेतली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी एम्स मध्ये जाऊन त्यांच्या प्रकृतीचा आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून डॉ.मनमोहन सिंग यांच्या आठवणींना उजाळा दिला. सोनिया गांधी देखील एम्समध्ये पोहचल्या असून राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आपला दौरा अर्धवट सोडून दिल्लीकडे रवाना झाले आहेत.

Advertisement

डॉ. मनमोहन सिंग यांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात भारतीय अर्थ व्यवस्थेने खऱ्या अर्थाने कात टाकली. भारताला जागतिकीकरणाच्या वाटेवर नेण्यात या अर्थ तज्ज्ञाचा सिंहाचा वाटा आहे. ते दहा वर्ष भारत कधीही विसरणार नाही.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *