क्राईम

मराठा क्रांती मोर्चाची मागणी: संतोष देशमुख यांना न्याय मिळाला नाही, तर संघर्ष अटळ; नाशिकच्या बैठकीत व्यवस्थेच्या षंडपणावर तीव्र संताप ;व्हाट्स ऍप विद्यापीठात टिव टिव करणारे मात्र बिळात


मराठा क्रांती मोर्चाची मागणी: संतोष देशमुख यांना न्याय मिळाला नाही, तर संघर्ष अटळ;

 

नाशिकच्या बैठकीत व्यवस्थेच्या षंडपणावर तीव्र संताप ;व्हाट्स ऍप विद्यापीठात टिव टिव करणारे मात्र बिळात

☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️

मराठी संस्कृती जतन करा 

…………………………………………………………………..

नाशिक प्रतिनिधी

आज नाशिक जिल्ह्यातील शिवतीर्थ येथे सकल मराठा समाजाच्या वतीने विशेष बैठक आयोजित करण्यात आली.बीड जिल्ह्यातील स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या उर्वरित मारेकऱ्यांना अटक करून आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी,या मागणीसाठी 28 तारखेला होणाऱ्या मोर्चासाठी नाशिक जिल्ह्यातून हजारो समाज बांधव उपस्थित राहणार असून त्याचे नियोजन यावेळी करण्यात आले. महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे या ठिकाणी सर्वसामान्य लोकांनाही कायद्याने न्याय मिळतो असा परिचय या राज्याचा आहे मात्र या राज्यात आता कायद्याचा धाक राहिला नाही तो धाक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी या घटनेतील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे व महाराष्ट्र राज्यात आजही कायदा सुव्यवस्था कायम असल्याचे आश्वासन या महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला देण्याची मागणी यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली. संतोष देशमुख यांचा दिवसाढवळ्या खून झाला गावासाठी झटणारा स्वतःच्या कुटुंबापेक्षाही गावावर प्रेम करणाऱ्या सरपंचाची या पद्धतीने हत्या झाली आहे लोकांच्या भांडण सोडवणे हे प्रत्येक गावातील सरपंचाला करावंच लागतं हे काम शासनाचा आहे ते काम बिन बोभाट पणे सरपंच करत असतात मात्र सरपंचाला जीव देण्याची वेळ आली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण सरपंचांमध्ये आता दहशतीचे वातावरण तयार झाले आहे हे हे भय काढून टाकण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी कडक पावले उचलण्याची मागणी ही यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली.

 

यावेळी मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक करण गायकर यांनी ठाम भूमिका मांडली की,”महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे,परंतु सध्या कायद्याचा धाक उरलेला नाही.गावासाठी प्रामाणिकपणे झटणाऱ्या सरपंचाची दिवसाढवळ्या हत्या होणे अत्यंत गंभीर बाब आहे.यामुळे संपूर्ण राज्यात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.”

Advertisement

त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना दोषींवर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी करत,”दोषींना त्वरित अटक केली नाही, तर महाराष्ट्रात संघर्ष निर्माण होईल,”असा इशारा दिला.

 

नानासाहेब बच्छाव यांनीही समाजाला मार्गदर्शन करताना सांगितले की,”कायदा सुव्यवस्था राखणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे.जर आरोपींना वाचविण्यासाठी प्रयत्न केले जात असतील,तर ते राज्यासाठी अत्यंत घातक आहे.” त्यांनी दोषींच्या सखोल चौकशीसह मुख्य आरोपींना अटक करून संतोष देशमुख कुटुंबीयांना न्याय देण्याची मागणी केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन डांगे पाटील यांनी केले तर आभार आशिष हिरे यांनी मांडले.

या मीटिंगसाठी मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक करण गायकर,नानासाहेब बच्छाव,आशिष हिरे,नवनाथ शिंदे,रोशन खैरे,सुभाष गायकर,योगेश गांगुर्डे,राम खुर्दळ, दादासाहेब जोगदंड,वैभव दळवी,संगीता सूर्यवंशी,विकी गायधनी, अनिल आहेर,बाळासाहेब गारूळे,अमर गायकवाड,ज्ञानेश्वर सुराशे,भारत पिंगळे,संकेत पिंगळे,अविनाश सूर्यवंशी,बाबासाहेब गायकवाड,विशाल पवार,अमोल पवार, दीप किशोर ठाकूर,अनिल पवार,रेखा जाधव,रागिनी आहेर,वैभव गव्हाड,सागर कातडं सुधाकर चांदवडे,सुनील शेलार,दावल पगारे,अनिल भावले,बबनराव बोडके, शुभम महाले,योगेश पाटील यांच्यासह असंख्य मराठा बांधव उपस्थित होते.

 

व्हाट्स ऍप विद्यापीठात टिव टिव करणारे बिळात:

 

कोपर्डीच्या घटनेनंतर सकल समाज बांधव प्रचंड क्रोधीत होऊन एकत्र आला आणि छत्रपती संभाजी महाराज नगर मधून लाखोंच्या संख्येने निघालेल्या मोर्चाने पहिला एल्गार केला. कोपर्डीच्या अन्यायातून समाजाच्या दाबलेल्या भावना या मोर्चातून पहिल्यांदा बाहेर पडल्या. त्यानंतर सलग वर्षभर ठिकठिकाणी लाखोंच्या संख्येने तब्बल ५८ मोर्चे निघाले. मराठा समाज साडे तीनशे वर्षानंतर पहिल्यांदाच एकत्र आल्याचे समाधान व्यक्त केले जात होते. तथापी हे समाधान फार काळ टिकले नाही. त्यानंतर विविध राजकीय पक्षांच्या दावणीला बांधलेलं आणि पक्षाच्याच गव्हाणीत चरणारे केवळ व्हाट्स ऍपवरच टिव टिव करीत असल्याबद्दल या बैठकीत विशेषतः महिला भगिनींनी खंत व्यक्त केली.

 

“स्व. संतोष देशमुख यांच्या खुनाशी संबंध असलेल्या मुख्य सूत्र धाराला जाणीव पूर्वक अभय दिले जात आहे. हा मुख्य सूत्रधार अटक झाला तर एक मोठा नेता अडचणीत येऊ शकतो. म्हणून त्याला अभय दिले जात आहे. या सूत्रधाराला अटक झाली नाही,तर महाराष्ट्र पेटून उठेल. त्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यावर राहील.”

-करण गायकर

राज्य समन्वयक

मराठा क्रांती मोर्चा


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *