क्राईम

भ्रष्टाचार निर्मूलन समितीतर्फे दिनकर चव्हाण पुरस्काराने सन्मानित


भ्रष्टाचार निर्मूलन समितीतर्फे दिनकर चव्हाण पुरस्काराने सन्मानित

 चांदवड (प्रतिनिधी):

Advertisement

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व मानव अधिकार ब्रिक्स ह्युमन रा ईट यांच्या 14 वे अधिवेशन लातुर येथे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच संपन्न या अधिवेशनात चांदवड तालुका अध्यक्ष दिनकर विठ्ठलराव चव्हाण यांना समितीतर्फे शहिद चंद्रशेखर आझाद राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीतर्फे चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्ना वर तसेच पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याच्या मांजरपाडा प्रकल्प विषयी चांदवड तहसील कार्यालयावर यशस्वी आंदोलने करून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा दिल्याने समितीने याच कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापुरकर यांचे हस्ते राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले यावेळी या कार्यक्रमासाठी देशातील सर्व प्रांताध्यक्ष महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उपस्थित होते डॉ. कविता रायजादा, राणीताई स्वामी ,सफलता सिंग, हितेश दाभाडे, पंडितराव तिडके, अतुलजी देसले, सारिका नागरे आदी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *