जिल्ह्यात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करावे; ब्रह्माकुमारीज् सेवाकेंद्रातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर
जिल्ह्यात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करावे;
ब्रह्माकुमारीज् सेवाकेंद्रातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर
नाशिक: प्रतिनिधी
प्रजापिता ब्रह्माकुमारीज् ईश्वरीय विश्वविद्यालय,नाशिक जिल्हा सेवा केंद्रातर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.यावेळी ब्रह्माकुमारी संस्थेच्यावतीने जिल्हा मुख्य संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरासह जिल्ह्यातील दिव्यांग शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या उन्नती व व्यक्तिमत्व विकासाकरिता विविध अद्यावत उपकरण व आधुनिक साधनांच्या माध्यमातून कार्यशाळा घेण्याबाबत प्रस्तावात सुचित करण्यात आले.
देशातील दिव्यांगांची विशेष सेवा करण्यासाठी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे आंतरराष्ट्रीय मुख्यालय माउंट आबू(राजस्थान) येथे दिव्यांग सेवा विभागातर्फे देशभरात विविध ठिकाणी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यावेळी जिल्हाधिकारी जलाश शर्मा यांना जिल्हा मुख्य संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदी यांच्या हस्ते शिवबाबांची सौगात भेट देण्यात आली. यावेळी वरिष्ठ राजयोग शिक्षिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी पूनम दीदी, माउंट आबू येथील प्रतिनिधी सूर्यकुमार भाई, कमलेश भाई,संजय भाई,म.राज्य अपंग संघटना विभागीय अध्यक्ष तथा राकॉं दिव्यांग सेल(SP) जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोनवणे सर आदी उपस्थित होते.
*फोटो कॅप्शन:-*
दिव्यांगबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना सादर करताना संस्थेच्या जिल्हा मुख्य संचालिका ब्रह्माकुमारी वासंती दीदी समवेत ब्रह्माकुमारी पूनम दीदी,सूर्यकुमार भाई, कमलेश भाई, संजय भाई, बाळासाहेब सोनवणे सर आदि.