देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने क्रीडा संमेलनाचा शुभारंभ
देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने क्रीडा संमेलनाचा शुभारंभ
देवळाली कॅम्प ( प्रतिनिधी ):- येथील देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने येथील स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल आनंद रोड मैदानावर स्वच्छता हि सेवा उपक्रमांर्तगत पर्यावरण रक्षणाचा संदेश पोहचविण्यासाठी जोश सांस्कृतिक क्रीडा प्रबोधिनीच्या संयुक्त विद्यमाने काल सोमवार दि.३० रोजी आयोजित भव्य क्रीडा संमेलन २०२४ चे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी स्कूल ऑफ आर्टिलरीचे स्कूल लेफ्टनंट जनरल एन. एस. सरना यांच्या हस्ते या क्रीडा संमेलनाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून अर्जुन पुरस्कार प्राप्त धावपटू कविता राऊत,ब्रिगेडियर आशिष भारद्वाज,कर्नल नीरज कुमार,
मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणी त्रिपाठी,महेश तुंगार व मुख्याध्यपिका राजश्री खैरनार आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते मैदानावर फुटबॉल ठोकर मारून व हवेत फुगे सोडून या क्रीडा संमेलनसाची सुरुवात झाली. त्याचबरोबर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने ई-कचरा संकलन व प्लास्टिक वेस्ट बँकेचा शुभारंभ लेफ्टनंट जनरल एन. एस. सरना धावपटू कविता राऊत यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी कविता राऊत यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करतांना कोणत्याही खेळात संयम हा महत्वाचा असल्याने संयमानेच यश गाठणे शक्य होत असल्याचा सल्ला दिला, तर ब्रिगेडियर आशिष भादरवाज यांनी कॅन्टोन्मेंट बोर्ड राबवित असलेल्या प्लास्टिक कचरा व्यवस्थापन व त्याचा आर्थिक मोबदला हा जनतेसाठी चांगला उपक्रम असल्याचे नमूद करत खेळातून प्रबोधन करणे हि काळाची गरज असल्याचे नमूद केले. दरम्यान दिवसभर मैदानावर १४ व १७ वर्षाखालील खेळाडूंसाठी फुटबॉल,हॉकी, व्हॉलीबॉल,खोखो,डोज बॉल, वैयक्तिक स्पर्धांमध्ये ५०,१००,२०० मीटर धावणे,डंबल्स रेस,रोप किपींग अशा स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धांमध्ये कॅन्टोन्मेंट बोर्ड प्राथमिक व माध्यमिक विदयालय, नूतन विद्या मंदिर,पीएम श्री केंद्रीय विद्यालय,आर्मी पब्लिक पेट्रिक्स हायस्कुल,आदर्श शिशु विहार, डॉ. गुजर सुभाष हायस्कुल,एसव्हीकेटी महाविद्यालय,देवळाली हायस्कुल येथील स्पर्धकांनी सहभाग घेतल. विजेत्या खेळाडूंना महात्मा गांधी जयंतीदिनी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे. आयोजनासाठी कार्यालयीन अधिक्षक विवेक बंड,आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता यांचेसह कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील होते तर स्पर्धा यशस्वीतेसाठी एन. डी. मुसळे, मनोज कनोजिया, रोहिणी पाटील, निकिता आगळे, पुनीत औटे,लखन कनोजिया, विकी मुठाळ, सतीश जाधव,रोहित सोनार, गुरुप्रीत कौर आदी प्रयत्नशील होते.