भावेंचे काय चुकले? – नाशिकमध्ये जाहीर परिसंवादाचे आयोजन

भावेंचे काय चुकले? – नाशिकमध्ये जाहीर परिसंवादाचे आयोजन
नाशिक प्रतिनिधी
नाशिक शहरातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून कार्यरत असलेल्या जितेंद्र भावेंवरील कारवाईच्या पार्श्वभूमीवर “भावेंचे काय चुकले?” या विषयावर जाहीर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
जितेंद्र भावे यांनी सामान्य नागरिकांचे प्रश्न हातात घेऊन भ्रष्ट आणि मुजोर व्यवस्थेविरुद्ध सातत्याने आवाज उठवला आहे. त्यांच्या कार्यपद्धतीवर काहींचे आक्षेप असले तरी त्यांना गुन्हेगार म्हणता येईल का, हा प्रश्न आयोजकांनी उपस्थित केला आहे. भावेंवर अनेक गुन्हे दाखल करून त्यांची तडीपारी करण्यात आल्याचा उल्लेख करत, मोठे राजकीय-सामाजिक गुन्हेगार मात्र दंडमुक्त राहतात, याबाबत संताप व्यक्त करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर भावेंच्या कार्याची चिकित्सा करण्यासाठी व त्यांना पाठिंबा द्यावा की नाही, यावर चर्चा करण्यासाठी हा परिसंवाद होणार आहे. प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. डी. एल. कराड, साथी शांताराम चव्हाण आणि लोकेश शेवडे यांचा समावेश आहे.
हा कार्यक्रम १६ ऑगस्ट २०२५ रोजी सायं. ५.३० वाजता शहिद भगत सिंग सभागृह, सीटू भवन, खुटवड नगर, नाशिक येथे पार पडणार आहे. आयोजक मुकुंद दीक्षित, प्रा. डॉ. मिलिंद वाघ, वासंती दीक्षित आणि प्रा. डॉ. संजय सावळे यांनी नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
—
संपादकीय थोड्याच वेळात:-
अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा की नाही?



