क्राईम

बागलाण भाजपामध्ये बंडखोरीचे संकेत..; दिलीप बोरसे यांच्या विरुद्ध कोकणा समाजाचा उमेदवार देण्यासाठी बैठकांना जोर


बागलाण भाजपामध्ये बंडखोरीचे संकेत..;

 

दिलीप बोरसे यांच्या विरुद्ध कोकणा समाजाचा उमेदवार देण्यासाठी बैठकांना जोर

 

 

 

नासिक (प्रतिनिधी) बागलाण तालुक्याचे विद्यमान आमदार दिलीप बोरसे यांचे विरुद्ध भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यामध्ये प्रचंड असंतोष असताना उमेदवारी देण्यात आल्यामुळे तालुक्यातील भाजप मध्ये प्रचंड संतप्त प्रतिक्रिया निर्माण झाली आहे.

 

विद्यमान आमदार दिलीप बोरसे यांच्या घराण्यात तब्बल तीन वेळा आमदारकी दिली असताना व कोकणा समाजाला डावलण्यात आल्याने भाजपावर कोकणा समाजाचा प्रचंड रोष आहे. लोकसभा निवडणुकी वेळी आ. दिलीप बोरसे यांनी भाजपचे माजी खा.डॉ सुभाष भामरे यांना पराभूत करण्यासाठी पठावे जिल्हा परिषद गटात प्रयत्नांची पराकाष्टा केल्याचें सर्वश्रुत आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करणाराच विद्यमान आमदार उमेदवार म्हणून दिल्याने बागलाण तालुक्यात विशेषता आदिवासी समाज,संघटनांत प्रचंड असंतोष पसरला आहे.

 

जसा भाजपवर कोकणा आदिवासी समाजाचा राग व्यक्त व्यक्त होत आहे. त्याच प्रमाणे शरचंद्र पवार गट देखील आदिवासी कोकणा समाजाच्या निशाण्यावर आलेला आहे.

 

बागलाण विधानसभा मतदारसंघात शरदचंद्र पवार गटाची उमेदवारी जाहीर केल्यानंतर आदिवासी संघटनांची व कोकणा समाजाची तातडीची बैठक होणार असल्याचे भटू महाले यांनी सांगितले.

 

भाजप कार्यकर्ते करणार दिलीप बोरसे यांचा पराभव:-

Advertisement

 

दरम्यान बागलाण भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, जिल्हाध्यक्ष यांनी विद्यमान आमदार दिलीप बोरसे यांच्याविरुद्ध पक्ष विरोधी कृत्य केल्याच्या असंख्य तक्रारी तसेच जनतेत नाराजी असताना उमेदवारी देऊ नये असा अहवाल दिला होता.तरी देखील उमेदवारी देण्यात आल्याने बागलाण तालुका भाजपामध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.

 

धुळे लोकसभा मतदार संघात भाजपाच्या पराभवानंतर आता बागलाण तालुक्यात देखील आमदारांचा पराभव भाजपच करेल असे पदाधिकारी लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे.

 

बागलाण तालुक्यात सर्वपक्षीय आदिवासी कोकणा समाज एकत्र:-

गेल्या निवडणुकांपासून सर्व राजकीय पक्षांकडे मागणी करूनही आदिवासी कोकणा समाजाला प्रतिनिधित्व मिळत नसल्याने समाजाचे पदाधिकारी ,माजी जिल्हा परिषद सभापती,सदस्य, पंचायत समिती सदस्य, असंख्य गावांचे सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे सभापती, उपसभापती ,सदस्य, राज्य आदिवासी संघटनांचे पदाधिकारी ,तसेच बागलाण तालुक्यातील सर्व आदिवासी संघटनांचे पदाधिकारी यांनी एल्गार पुकारला आहे.

बैठकीस माजी मंत्री स्वर्गीय ए टी पवार यांच्या कन्या गीतांजली पवार , जिल्हा परिषदेचे माजी सभापती पोपटराव अहिरे, वसंत गवळी , माजी जिल्हा परिषद सदस्या साधना गवळी , माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश अहिरे, आदिवासी संघटनेचे श्री राम चौरे , तसेच सटाणा येथील दंगलीतील पिडीत आदिवासी तरुण सहभागी होणार आहेत.

येणाऱ्या निवडणुकीत सर्व आदिवासी बांधवांनी एकत्र येऊन निवडणूक लढविण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यासाठी तातडीची बैठक बोलविण्यात आली होती अशी माहिती आदिवासी संघटनेचे भटू महाले यांनी दिली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *