*अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील पोलीस नाईक खेडकर लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात*
*अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील पोलीस नाईक खेडकर लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात*
नेवासा प्रतिनिधी:
दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी पाच हजारांची लाच स्वीकारताना कुकाणा (ता. नेवासा) येथील पोलिस नाईकास पाच हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. तुकाराम भीमराव खेडकर (वय ३५) असे या पोलिस नाईकाचे नाव आहे.
कुकाणा पोलिस चौकीत तक्रारदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात सहकार्य करण्याच्या बदल्यात खेडकर याने दहा हजारांच्या लाचेची मागणी केली. यासंदर्भात तक्रारदार यांनी खेडकर व नंदू सरोदे अशा दोघांनी लाच मागितली आहे, अशी तक्रार अहमदनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला प्राप्त झाली होती. त्यानुसार पथकाने पडताळणी केली असता तडजोडीअंती खेडकर याने पाच हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे समोर आले. पोलिसांनी मंगळवारी (दि. १६) सापळा रचला. त्या वेळी खेडकर याला तक्रारदार यांच्याकडून पाच हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडले. तसेच नंदू सरोदे व पोपट सरोदे (पूर्ण नाव माहीत नाही) अशा दोघांविरोधात नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.