येवला तालुक्यातील पाटोदा येथे गोरक्षकांच्या मदतीने 26 गोवंशाची सुटका.
येवला तालुक्यातील पाटोदा येथे गोरक्षकांच्या मदतीने 26 गोवंशाची सुटका.
पाटोदा प्रतिनिधी:- सचिन शिंदे
पाटोदा येथे गोरक्षकांच्या मदतीने कत्तलीसाठी जाणाऱ्या 26 गोवंशाची सुटका करण्यात आली आहे येवला शहर व तालुका पोलीस यांनी ही संयुक्त कारवाई केली आहे
पाटोदा येथील गोरक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार येवला व मालेगाव गोरक्षकांनी ही कारवाई केली आहे..
संशयित लल्लू देशमुख हा व्यक्ती परिसरातील गोवंश चोरीछुपे पद्धतीने मालेगाव व इतर ठिकाणी कत्तली साठी पाठवत असल्याची गुप्त माहिती गोरक्षकांना मिळाली होती.
त्यानुसार गोरक्षकांनी पोलिसांच्या मदतीने 26 गोवंशाची सुटका केली आहे..
या घटनेच्या निषेधार्थ आज सकाळी पाटोदा गाव कडकडीत बंद ठेवण्यात आले व गावातील गोरक्षक तसेच बजरंग दल तसेच गावकऱ्यांनी झालीच पाहिजे झालीच पाहिजे गो हत्या बंद झालीच पाहिजे अशा घोषणा देत गावातून रॅली काढण्यात आली..