ताज्या घडामोडीसामाजिक

भाजपच्या वतीने घाटकोपर विक्रोळी परिसरात वृक्षारोपण  मुकुंद काकड यांचे योगदान 


भाजपच्या वतीने घाटकोपर विक्रोळी परिसरात वृक्षारोपण 

मुकुंद काकड यांचे योगदान 

 

घाटकोपर विक्रोळी प्रतिनिधी 

 

भाजपच्या घाटकोपर विक्रोळी शाखेच्या वतीने वार्ड क्रमांक १२५ मध्ये वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. आमदार पराग शाह यांच्या मार्गदर्शनात एक पेड माँ के नाम हा संदेश घेऊन हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महानगरपालिका शाळा क्रमांक तीन माता रमाबाई आंबेडकर नगरमधील महापालिकेच्या शाळा क्रमांक तीनच्या मुख्याध्यापिका यांच्या मागणीनुसार मंडळ उपाध्यक्ष मुकुंद काकड यांच्याकडून अशोकाची झाडे व प्रकारचे वृक्ष देण्यात आली आहे .

Advertisement

या कार्यक्रमास वार्डातील सर्व पदाधिकारी आणि मंडळ पदाधिकारी उपस्थित होते.

 

महानगरपालिका शाळा क्रमांक तीन माता रमाबाई आंबेडकर नगर या ठिकाणी शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी यावेळी शाळेच्या मैदान नूतनीकरण प्रस्ताव मांडला.यावेळी वार्ड क्रमांक १२५ चे अध्यक्ष संघदीप केदारे,

महामंत्री शशिकांत घोडके,महामंत्री वैभव पाचपुते,महिला वार्ड अध्यक्ष सविताताई कापसे, उपाध्यक्ष सचिन सकट,मंडळ उपाध्यक्ष मुकुंद काकड

महामंत्री राणा सिंग यांच्यासह मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *