ठाणगाव येथे जनसेवा सेवाभावी संस्थेच्या वतीने जिजाऊंना अभिवादन
ठाणगाव येथे जनसेवा सेवाभावी संस्थेच्या वतीने जिजाऊंना अभिवादन
सिन्नर प्रतिनिधी
ठाणगाव येथे जनसेवा सेवाभावी संस्थेच्या वतीने राजमाता जिजाऊ पुण्यतिथी साजरी करण्यात आली. राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन, जनसेवा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रामदास भोर, ग्रामपंचायत सदस्य, मोहन आव्हाड, आशापुरचे माजी सरपंच विष्णुपंत पाटोळे, माजी पोलीस अधिकारी भाऊसाहेब काकड ,माजी सरपंच उत्तम शिंदे, प्रगतशील शेतकरी शांताराम शिंदे, सुभाष शिंदे, मोहन शिंदे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
ज्यांनी आपल्या स्वराज्याची स्वप्न बघितले आणि फक्त बघितलेच नाही तर ते सत्यात उतरविले त्या म्हणजे आपल्या मासाहेब जिजाऊ. भारतीय पुराणांमध्ये आदर्श शक्तीचा उल्लेख हा केलेला दिसतो या आदर्श शक्तीचे दर्शन सर्व जगाला राजमाता जिजाऊंच्या रूपाने घडले,व राजमाता जिजाऊ ह्या मराठी जन माणसाची अखंड प्रेरणा आहोत त्यांना आपण जिजाऊ, राजमाता, मासाहेब स्वराज्य जननी असेही म्हणतो, अशा शब्दात शिव प्रेमी के एल शिंदे यांनी जिजाऊचा गौरव केला.राजमाता जिजाऊच्या प्रतिमेला अभिवादन करताना जनसेवेचे अध्यक्ष रामदास भोर , मोहन आव्हाड, विष्णुपंत पाटोळे, उत्तम शिंदे, भाऊसाहेब काकड, शांताराम शिंदे, सोमनाथ शिंदे, कैलास व्यवहारे,मोहन शिंदे, अण्णासाहेब शिंदे, सुभाष शिंदे, दत्तात्रय शिंदे, आदिनाथ शिंदे,आदी उपस्थित होते.