सिन्नरच्या सरस्वती नदीवरील पुलाची उंची वाढवण्याची मागणी ; राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार) यांचे खासदार आमदारांना निवेदन
सिन्नरच्या सरस्वती नदीवरील पुलाची उंची वाढवण्याची मागणी ;
राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार) यांचे खासदार , आमदारांना निवेदन
सिन्नर प्रतिनिधी
नाशिक वेशीबाहेर असलेला
सरस्वती नदीवरील पुलाची उंची कमी असल्याने अर्ध्या तासाच्या पावसाने पाणी तुंबते. पर्यायाने वाहतुक कोंडी होती.
हि परिस्थिती लक्षात घेता हजारो नागरिकांची ये – जा असणाऱ्या व ऊपनगरांना जोडणारा या पुलाची उंची वाढवण्यात यावी.अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी शहराध्यक्ष नामदेव कोतवाल यांनी केली आहे.
शहरातील अनेक ऊपनगरांना जोडणारा हा पुल आहे…तसेच या पुलावरून सिन्नर महाविद्यालय..व्हि एन नाईक महाविद्यालय भिकुसा हायस्कूल गावाबाहेरील देवी मंदिर..भैरवनाथ मंदिराकडे जाणारे भाविक व हजारो नागरीकांची ये जा चालू असते..दोन वर्षांपूर्वी शहरातील महापुराने याच पुलावरून एक परप्रांतीय कामगार पुरात वाहुन गेला होता..तसेच पुलावर बसुन हातगाड्यावर विक्री करणाऱ्यांचे हातगाडे वाहुन गेले होते.
तत्कालीन खा.वसंतराव पवार यांच्या खासदार निधीतून हा सरस्वती नदीवरील पूल पंचवीस वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता.. परंतु त्यावेळची शहरातील लोकसंख्या व आजची लोकसंख्या ही दुपटीने वाढ झाली आहे..तसेच मोठा पाऊस झाल्यास पुलावरील वहातुक ठप्प होऊन जनजीवन यापूर्वी विस्कळित झाले आहेत.याकडे ही
श्री कोतवाल यांनी लक्ष वेधले आहे.
त्यामुळे या पुलाची उंची व रूंदी वाढवल्यास भविष्यातील संभाव्य संकटावर मात करता येईल.त्यादृष्टीने सरस्वती नदीवरील खासदार पुलाची उंची वाढवण्यात यावी.अशी मागणी श्री कोतवाल यांनी केली आहे.या मागणीचे निवेदन त्यांनी खा.राजाभाऊ वाजे आ.माणिकराव कोकाटे
मुख्याधिकारी रितेश बैरागी यांना दिले आहे.