ताज्या घडामोडी

गोसाविंच्या निवेदनाची पोलिस महासंचालकांनी घेतली दखल 


डि जे प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कारवाईचे आदेश 

 

गोसाविंच्या निवेदनाची पोलिस महासंचालकांनी घेतली दखल 

 

सिन्नर प्रतिनिधी 

नाशिक जिल्ह्यामधील प्रत्येक गावांमध्ये डीजेच्या आवाजावर निर्बंध लावण्याबाबत पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी जिल्हा पोलिसांनी पुन्हा आदेशीत केले आहे याबाबत सिन्नर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय गोसावी यांनी पोलिस महासंचालकांना निवेदन दिले होते. त्याची दखल घेऊन पोलिस महासंचालकांनी प्रत्येक पोलिस ठाण्याला स्वतंत्र आदेश दिले आहेत.

Advertisement

यात त्यांनी म्हटले आहे की, डीजेच्या उच्च पातळीच्या आवाजाने होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाबाबत न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून उच्च ध्वनी पातळीवर चालणाऱ्या डीजे मालक व चालक व उच्च ध्वनी च्या पातळीस जबाबदार असणाऱ्या लोकांवर पोलीस विभागाकडून प्रचलित कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी. डीजेच्या आवाजाने शाळा कॉलेज दवाखाना तसेच वयोवृद्ध हृदयाचे आजारी पेशंट लहान मुलांना गरोदर मातांना पशु पक्षांना डीजेच्या मोठ्या आवाजाचा त्रास सहन करावा लागत असे डीजेच्या आवाजावर निर्बंध घातल्यामुळे दत्तात्रय गोसावी यांनी समाधान व्यक्त केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *