दापुर (सिन्नर)येथे शॉर्ट सर्किटमुळे घर उध्वस्त
*दापुर येथे आगीत दुचाकी सह संसारोपयोगी साहित्य जळुन खाक*.
सिन्नर प्रतिनिधी
सिन्नर तालुक्यातील दापुर येथे सत्यवान (भगवान) बाळु पालवे यांचे पत्र्याचे शेडवजा घराला आज पहाटे ५:००वाजेच्या सुमारास शाॅर्टसर्किटने अचानक आग लागली.त्यात मोटारसायकल सह संसारोपयोगी साहित्य, कपडे,रोख रक्कम, दोन तोळे दागिने ,असा ऐवज जळुन खाक झाला. श्री.सत्यवान उर्फ भगवान बाळु पालवे आपल्या कुटुंबासह रात्री जेवण वगैरे आटोपुन शेजारील घरात झोपण्यासाठी गेले असता पहाटे ५वाजेच्या सुमारास त्यांच्या पत्र्याच्या शेडवजा घराला अचानक आग लागली.
आगीत होंडा कंपनीची पॅशन प्रो दुचाकी सह संसारोपयोगी साहित्य,धान्य,सोने,रोख रक्कम ,कपडे आदी वस्तु जळुन खाक झाले.राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष योगेश आव्हाड, ग्रामपंचायतीचे मा.सरपंच, सदस्य नवनाथ आव्हाड, जगन्नाथ सोनवणे,दत्ता सोनवणे, योगेश सोनवणे, अमोल शिंदे आदिंनी घटनास्थळी भेट देऊन सदर कुटुबाला मदतीचे आश्वासन दिले.तसेच मा.सागर मुंदडा साहेब तहसीलदार (सामान्य प्रशासन) सिन्नर,मा.पाटील मॅडम तलाठी दापुर यांच्याशी संपर्क साधून पंचनामा करण्यात आला.
शासनाने नुकसान ग्रस्त कुटुंबाला योग्य ती भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.