ताज्या घडामोडीसामाजिक

अंजनेरी गडावर जपानुष्ठान सोहळ्याची उत्साहात सांगता   शांतिगिरीजी महाराजांच्या प्रेरणेने २० वर्षांपासून सप्ताहाचे आयोजन 


अंजनेरी गडावर जपानुष्ठान सोहळ्याची उत्साहात सांगता 

 

 शांतिगिरीजी महाराजांच्या प्रेरणेने २० वर्षांपासून सप्ताहाचे आयोजन 

 

 

नाशिक : प्रतिनिधी 

निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराजांच्या कृपाशीर्वादाने उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्रीसंत सदगुरू स्वामी शांतीगिरीजी महाराजांच्या प्रेरनेने व प्रमुख उपस्थितीत हनुमान जन्मोत्सवा निमित्त अंजनेरी गडावर आठवड्याभरापासून सुरू असलेल्या जपानुष्ठान सोहळ्याची सांगता जय बाबाजी..जय श्रीराम..जय हनुमान.. अशा प्रचंड जय घोषात करण्यात आली. श्री हनुमान जन्मोत्सवाच्या महापर्वकालावर अभिषेक पूजन,सत्संग,भजन करत जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

श्रीराम भक्त हनुमंतरायाची जन्मभूमी असलेल्या अंजनेरी गडाचा सर्वांगीण विकास व्हावा या एकाच

Advertisement

उद्देशाने गेल्या वीस वर्षांपासून निष्काम कर्मयोगी जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज धर्मपीठाचे पिठाधिश्वर अनंत विभूषित समर्थ सदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि प्रमुख उपस्थितीत श्रीक्षेत्र अंजनेरी गड येथे आठवडाभर जपानुष्ठान व श्रीहनुमान जन्मोत्सवाचे प्रतिवर्षी मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात येते.याहीवर्षी आठवडाभर संपन्न झालेल्या या कार्यक्रमा दरम्यान श्रीराम कथा,जपानुष्ठान,अखंड नंदादीप,हस्त लिखित नामजप,व्यसन मुक्ती संकल्प,यज्ञ,श्रमदान यांसह रोज पहाटे ब्रम्हमुहूर्तावर पाच वाजता नित्यनियम विधी,प्राणायाम,ध्यान,भागवत वाचन,महाआरती, सकाळ- सायंकाळ प्रवचन,सत्संग आदी भरगच्च कार्यक्रम संपन्न झाले.प्रसिद्ध कथाकार अनंत महाराज वहाडणे यांच्या वाणीतून श्रीराम कथा संपन्न झाली. महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत या सोहळ्याची सांगता करण्यात आली.श्री हनुमान जन्मोत्सवदिनी अभिषेक पूजन,नामजप,जन्मोत्सव आदी विविधांगी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.यावेळी उत्तराधिकारी अनंत विभूषित स्वामी शांतीगिरीजी महाराजांच्या उपस्थितीत अंजनेरी गडावर श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी जय बाबाजी भक्त परिवारातील आश्रामीय संत व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.अंजनेरी गडाचा विकास व महारुद्र हनुमंताचे भव्य मंदिर होण्यासाठीचा संकल्प जय बाबाजी भक्त परिवाराने केला आहे अंजनेरी गडाच्या विकासासाठी भक्त परिवाराच्या वतीने गेल्या २० वर्षांपासून येथे जपानुष्ठान सोहळ्याचे आयोजन करण्यात येते श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती यावेळी भक्त परिवाराच्या वतीने देण्यात आली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *